आपल्या देशाच्या सीमा पूर्वीपेक्षाही अधिक सुरक्षित झाल्या आहेत. लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी आणि आपले सैन्य युद्धासाठी नेहमी सज्ज असावे, यासाठी आपल्या सैन्यात सातत्याने सुधारणा होत आहेत. आपण आधी रोज ऐकत होतो, येथे बॉम्ब स्फोट झाला, तेथे बॉम्ब स्फोट झाला. ठीक-ठीकाणी लिहिलेले असायचे, बॅगला स्पर्श करू नका. आज देश शांतता अनुभवत आहे. साखळी बॉम्ब स्फोट आता भूतकाळातल्या गप्पा झाल्या आहेत. निर्दोष नागरिकांचा होणारा मृत्यू, आता भूतकाळातील गोष्टी झाल्या आहेत. आज देशातील दहशतवादी हल्ल्यात मोठी घट झाली आहे. नक्षलग्रस्त भागांतही मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाले आहे. परिवर्तनाचे वातावरण आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून सलग १० व्यांदा तिरंगा ध्वज फडकावल्या नंतर, उपस्थित नागरिकांना संबोधित करत होते.
"...तेव्हा घटना मणिपूरमध्ये घडली तरी वेदना महाराष्ट्राला होते"पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी जेव्हा एकात्मतेसंदर्भात बोलतो, तेव्हा घटना मणिपूरमध्ये घडली तरी वेदना महाराष्ट्राला होते. पूर जन्य परिस्थिती आसाममध्ये निर्माण झाली, तर चितीत केरळ होते. आम्ही एकत्मतेची अनुभूती करतो. माझ्या देशाच्या मुलींवर अत्याचार होऊ नये, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. कोरोना काळात जेव्हा जगातील एखाद्या देशात माझा शीख भाऊ लंगर लावत होता, तेव्हा संपूर्ण भाराताची छाती चौडी होत होती."
हजार-बाराशे वर्षांपूर्वी या देशावर आक्रमण झाले अन्... - मोदी म्हणाले, "आपण जेव्हा इतिहासावर दृष्टी टाकतो, तेव्हा इतिहासात काही प्रसंग असे येतात, जे आपली कधीही न पुसली जाणारी छाप सोडून जातात आणि त्याचा परिणाम वर्षानू वर्षे राहतो. कधी कधी ती फार छोटीशी घटना वाटते. मात्र ती नंतर अनेक समस्यांचे मूळ बनते. हजार बाराशे वर्षांपूर्वी या देशावर आक्रमण झाले. एका छोट्याशा राजाचा पराभव झाला. मात्र, तेव्हा माहीतही नव्हते, की एक घटना भारताला हज वर्षाच्या गुलामीत अडकवेल आणि आपण गुलामीत अडक केलो. जे आले ते लुटत गेले, ज्याला वाटले, आले आणि आपल्यावर येऊन स्वार झाले. बंधूंनो घटना छोटी का असेना. पण तीने हजार वर्षे प्रभाव सोडला."
...आणि देशातील नारी शक्ती, युवा शक्ती, शेतकरी, देशासाठी उभे राहिले - "मी आज याचा उल्लेख यासठी करत आहे, की भारताच्या वीरांनी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जबरदस्त संघर्ष केला. बलिदान दिले. मा भारती बेड्यांमधून मुक्त होण्यासाठी उभी राहिली होती आणि देशातील नारी शक्ती, देशातील युवा शक्ती, देशातील शेतकरी, मजदूर, असे अनेक लोक देशासाठी उभे राहिले. अनेक जण बलिदानासाठी तयार झाले होते. एक फौजच तयार झाली होती. हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होते," असे मोदी म्हणाले.