शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Independence day 2023 : देश मणिपूरच्या नागरिकांसोबत, शांततेतूनच समाधानाचा मार्ग निघेल; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 08:05 IST

Happy 77th Independence Day : "आपण जेव्हा इतिहासावर दृष्टी टाकतो, तेव्हा इतिहासात काही प्रसंग असे येतात, जे आपली कधीही न पुसली जाणारी छाप सोडून जातात आणि त्याचा परिणाम वर्षानू वर्षे राहतो. कधी कधी ती फार छोटीशी घटना वाटते. मात्र ती नंतर अनेक समस्यांचे मूळ बनते."

गेल्या काही आठवड्यांत इशान्य भारतात विशेषतः मणिपूरमध्ये आणि भारताच्या इतरही काही भागांत, मात्र प्रामुख्याने मणिपूरमध्ये जो हिंसाचार झाला. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानासोबत जो प्रकार घडला. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शांततेच्या बातम्या येत आहे. देश मणिपूरच्या नागरिकांसोबत आहे. मणीपूरने गेल्या काही दिवसांत जी शांतता राखली आहे. तशीच राखावी, कारण यातूनच समाधानाचा मार्ग निघेल. यासाठी सरकारही योग्य ते प्रयत्न करत आहे आणि करत राहील, असा विश्वासपंतप्रधान मोदी यांनी आज मणिपूरच्या नागरिकांना दिला. ते ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून सलग १० व्यांदा तिरंगा ध्वज फडकावल्या नंतर, उपस्थित नागरिकांना संबोधित करत होते.

यावेळी देशाच्या अनेक भागांत नेसर्गित आपत्ती आली. ज्यांना यांचा सामना करावा लागला. ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या प्रती मी सहवेदना व्यक्त करतो. राज्य आणि केंद्र सरकार एकत्रीत पणे या संकटातून बेहेर पडण्यासाठी प्रयत्न करेल आणि आपण पुन्हा एकदा विकासाच्या मार्गाने पुढे जाऊ.

घटना छोटी असली तरी ती नंतर समस्या बनते... -मोदी म्हणाले, "आपण जेव्हा इतिहासावर दृष्टी टाकतो, तेव्हा इतिहासात काही प्रसंग असे येतात, जे आपली कधीही न पुसली जाणारी छाप सोडून जातात आणि त्याचा परिणाम वर्षानू वर्षे राहतो. कधी कधी ती फार छोटीशी घटना वाटते. मात्र ती नंतर अनेक समस्यांचे मूळ बनते. हजार बाराशे वर्षांपूर्वी या देशावर आक्रमण झाले. एका छोट्याशा राजाचा पराभव झाला. मात्र, तेव्हा माहीतही नव्हते, की एक घटना भारताला हज वर्षाच्या गुलामीत अडकवेल आणि आपण गुलामीत अडक केलो. जे आले ते लुटत गेले, ज्याला वाटले, आले आणि आपल्यावर येऊन स्वार झाले. बंधूंनो घटना छोटी का असेना. पण तीने हजार वर्षे प्रभाव सोडला."

"मी आज याचा उल्लेख यासठी करत आहे, की भारताच्या वीरांनी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी जबरदस्त संघर्ष केला. बलिदान दिले. मा भारती बेड्यांमधून मुक्त होण्यासाठी उभी राहिली होती आणि देशातील नारी शक्ती, देशातील युवा शक्ती, देशातील शेतकरी, मजदूर, असे अनेक लोक देशासाठी उभे राहिले. अनेक जण बलिदानासाठी तयार झाले होते. एक फौजच तयार झाली होती. हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होते," असे मोदी म्हणाले.

या काळात घडणाऱ्या घटना येणाऱ्या एक हजार वर्षांसाठी आपला प्रभाव सोडणार -मोदी म्हणाले, "मी हजार वर्षांपूर्वीची गोष्ट यासाठी करत आहे, कारण मी बघत आहे, की देशासमोर पुन्हा एकदा संधी आली आहे. आपण भारताच्या या अमृत कालखंडात प्रवेश केला आहे, ही आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. या कालखंडात आपण जे काही करू, जी पावले उचलू, त्याग करू, निर्णय घेऊ, येणाऱ्या एक हजार वर्षांचा देशाचा स्वर्णिम इतिहास यातून अंकुरीत होणार आहे. या काळात घडणाऱ्या घटना येणाऱ्या एक हजार वर्षांसाठी आपला प्रभाव सोडणार आहे." 

माझी भारत माता आज पुन्हा एकदा जागृत झाली आहे -"गुलामीच्या माणसिकतेतून बाहेर पडलेला हा देश आज नव्या आत्मविश्वासाने आणि संकल्पाने पुढे वाटचाल करत आहे. माझी भारत माता जी कधीकाळी उर्जेचे सामर्थ्य होती. ती आज पुन्हा एकदा जागृत झाली आहे. भारताच्या सामर्थ्याप्रती एक नवी आशा निर्माण झाली आहे. जगात एक नवा विश्वास निर्माण झाला आहे," असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीBJPभाजपा