शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2021: मोदींचा मोठा संदेश, म्हणाले, ‘’सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याबरोबरच आता…’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 09:21 IST

Independence Day 2021, PM Narendra Modi Speech: देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्य्यांवरून देशवासियांशी संवाद साधला.

नवी दिल्ली - देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्य्यांवरून देशवासियांशी संवाद साधला. तसेच देशवासियांना महत्त्वाचा मंत्रही दिला. ‘’आपल्या देशाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास सोबतच सबका प्रयास आवश्यक आहे’’ असा संदेश मोदींनी दिला.

देशवासियांना उद्देशून केलेल्या आपल्या संबोधनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या श्रद्धेने आम्ही सर्वजण एकत्र जोडले गेलो आहोत. आज मी लाल किल्ल्यावरून आवाहन करतो की, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याबरोबरच सबका प्रयास आमच्या प्रत्येक लक्ष्याच्या प्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

यावेळी मोदींनी येथून पुढच्या २५ वर्षांचा प्रवास भारताचा सृजनाचा अमृतकाळ आहे. या अमृतकाळामध्ये आपल्या संकल्पांची सिद्धी आम्हाला स्वातंत्र्याच्या १०० वर्षांपर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच  २१ व्या शतकामध्ये भारताला एका नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी भारताच्या सामर्थ्याचा योग्य आणि पूर्ण वापराची आवश्यकता आहे. त्यासाठी जे घटक, क्षेत्र मागे आहे त्यांची हँड होल्डिंग करणे आवश्यक आहे, असे मतही मांडले.

त्याबरोबरच आज आपण करत असलेले संकल्प देशाच्या १०० व्या स्वातंत्र्य दिनी सिद्ध होतील. त्यावेळी या लाल किल्ल्यावरून जे कुणी पंतप्रधान भाषण करतील. ते आज आपण करत असलेल्या संकल्पांची सिद्धता झाल्याचा उल्लेख करतील, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन