शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2020 : ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र देण्यासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस का निवडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 09:23 IST

देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली. 

भारत आपला ७४वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. पण देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली. 

माऊंटबॅटन यांना दिला होता अधिकार

जेव्हा इंग्रजानी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला तेव्हा हेही ठरवले की, लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाइसरॉय असतील. ब्रिटीश संसदेने त्यांना ३० जून १९४८ पर्यंत भारताची सत्ता भारतातील लोकांना हस्तांतरित करण्याचा वेळ दिला होता. खरंतर या दिवशीच स्वातंत्र्य का दिले गेले याबाबत अनेक मतमतांतरे बघायला मिळतात. 

नेहरु आणि जिना वाद

एकीकडे महात्मा गांधी भारत छोडो आंदोलन होतं आणि दुसरीकडे फाळणीवरुन गांधी आणि जिना यांच्यात वाद होते. या दोन कारणांमुळे माऊंटबॅटन यांच्यावरील सत्ता हस्तांतरणाचा दबाव वाढू लागला होता. त्यामुळे त्यांनी आणखी एक वर्ष वाट पाहण्याऐवजी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य बहाल केलं. १५ ऑगस्ट ही तारीख निवडण्यामागे हेही एक कारण मानलं जातं. 

या तारखेला मिळणार होते स्वातंत्र्य

माऊंटबॅटन हे भारतात आल्यानंतर स्वातंत्र्याबाबत अनेक बदल केले गेले. त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची तारीख ३ जून १९४८ ठरवली होती. पण ही तारीख बदलून त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ केली. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय मानला जातो. 

यासाठीही १५ ऑगस्ट दिवस खास

लॉर्ड माऊंटबॅटन हे १५ ऑगस्टला यासाठीही महत्वाचा दिवस मानत होते, कारण याच दिवशी १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जपानने ब्रिटीश सेनेसमोर शरणागती पत्करली होती. माऊंटबॅटन यांना ही तारीख यासाठी अधिक लक्षात होती कारण ते त्यावेळी अलायस फोर्सेसचे कमांडर होते. 

लॅरी कॉलिंग आणि डोमिनिक लॅपिअर यांच्या 'फ्रिडम अॅट मिड नाइट' या पुस्तकात माऊंटबॅटन यांनी ही तारीख का निवडली याचं कारण सांगितलं आहे. व्हाइसरॉय यांच्यानुसार, 'एका प्रश्नाचं उत्तर देताना मी १५ ऑगस्ट हा दिवस निवडला. मला लोकांना हे दाखवायचे होते की, सगळंकाही माझ्या नियंत्रणात आहे. मला विचारण्यात आले होते की, कोणती तारीख निश्चित केली आहे. त्यावेळी माझ्या डोक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना आला होता. त्यानंतर मी १५ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. याच तारखेला द्वितीय महायुद्धात जपानने ब्रिटीश सेनेसमोर समर्पण केलं होतं'.

भारत-पाकिस्तान फाळणी

स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच देशाचे दोन तुकडे करण्यात आले. फाळणीसोबतच भारतातील ५०० पेक्षा जास्त संस्थांनांचंही विभाजन केलं जाणार होतं. ब्रिटीश सरकारने या संस्थानांच्या राजांना संदेश दिला होता की, ते त्यांच्या मतानुसार भारत किंवा पाकिस्तानात जाणे ठरवू शकता. 

इंग्रजांना होती जिनांच्या मृत्यूची भीती

काही इतिहासकारांचं असं मत आहे की, इंग्रजांनी जिना यांच्या आधारे भारताची फाळणी करण्याचा कट रचला होता. जेणेकरुन दोन्ही देश हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरुन भांडत राहतील. त्यावेळी इंग्रजांना जिना यांच्या आजाराबाबत माहिती मिळाली होती. त्यांना भीती होती की, जर जिना यांचा मृत्यू स्वातंत्र्याच्या घोषणेच्याआधी झाला तर महात्मा गांधी मुस्लिमांना विभाजनाचा रस्ता न निवडण्यासाठी तयार करतील. त्याच कारणाने इंग्रजांनी ३ जून १९४८ ऐवजी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य बहाल केले. नंतर तेच झालं ज्याची इंग्रजांना भीती होती. स्वातंत्र्याच्या काही महिन्यातच टीबी या आजारामुळे मोहम्मद अली जिना यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतhistoryइतिहासInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स