शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day 2019 : केवळ भारतातच नाही तर 'या' देशातही आजच साजरा होतो स्वातंत्र्य दिवस!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 10:01 IST

आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. आज भारतात ७३ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे.

15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा होत आहे. आज भारतात ७३ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. मात्र, आजच्याच दिवशी फक्त भारतच नाही तर, जगातील आणखी तीन देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं. भारताव्यतिरिक्त ज्या तीन देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं त्या देशांमध्ये दक्षिण कोरिया, बहरिन आणि कांगो या देशांचा समावेश आहे. 

खरं तर आपल्या देशाला ब्रिटीश 1947 रोजी नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच 1948 रोजी स्वतंत्र करणार होते. पण महात्मा गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनाने ब्रिटिशांना सळो की पळो केलं होतं. त्यामुळे वैतागलेल्या ब्रिटीशांनी एक वर्षाआगोदर 15 ऑगस्ट 1947 रोजीच स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. 

जपानच्या अधिपत्याखाली असलेल्या कोरियाला 15 ऑगस्ट 1945 रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं. 1910 ते 1945 पर्यंत कोरिया जापानच्या गुलामगिरीत होता. आज आपण ज्या देशांना दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया म्हणून ओळखतो, ते आधी एकत्र होते. त्यानंतर 1948मध्ये त्यांना दोन देशांमध्ये वेगळं करण्यात आलं.

15 ऑगस्ट 1971पर्यंत मुळचा अरबांचा देश असलेला बहरिन ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता. सध्याची बहरिनची राजधानी मनामा आहे. 

15 ऑगस्ट 1960रोजी कांगो फ्रांसपासून वेगळा झाला. कांगो जवळपास 80 वर्षांपर्यंत फ्रान्सच्या गुलामगिरीत होता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जगातील 11व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत