शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Gallantry Medals 2021: गलवान खोऱ्यात चीनला नडलेले; 20 जवानांना वीरतेचे पोलीस मेडल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 14:40 IST

ITBP personnel awarded by Gallantry medals: आयटीबीपीने यांची माहिती दिली. लडाखच्या भारत-चीन सीमेवर गेल्या वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यातील वेगवान प्रवाहाच्या नदीमध्ये भारतीय सैनिकांवर चीनने भ्याड हल्ला केला होता. यावेळी भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांचा वार माघारी परतवून लावताना चिनी सैनिकांचे मोठे नुकसान केले होते.

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्ताने 1380 पोलीस पदकांची (gallantry medals) घोषणा करण्यात आली. यामध्ये आयटीबीपीच्या 23 जवानांना स्वातंत्र्य दिनी वीरता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये 20 जवान हे गेल्या वर्षी चीनच्या सैनिकांना गलवान खोऱ्यात भिडले (galwan valley clash) होते आणि वीरमरण पत्करले होते. (20 ITBP personnel who fought Chinese troops in Ladakh get gallantry medals)

आयटीबीपीने यांची माहिती दिली. लडाखच्या भारत-चीन सीमेवर गेल्या वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यातील वेगवान प्रवाहाच्या नदीमध्ये भारतीय सैनिकांवर चीनने भ्याड हल्ला केला होता. यावेळी भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांचा वार माघारी परतवून लावताना चिनी सैनिकांचे मोठे नुकसान केले होते. चीनने अद्याप किती सैनिक मारले गेले याचा आकडा जाहीर केलेला नसला तरीदेखील 40 हून अधिक सैनिक मारले गेल्याचे सांगितले जाते. आयटीबीपीने सांगितले की सीमेवरील संघर्ष आणि सुरक्षा कर्तव्यांसाठी जवानांना आतापर्यंत दिले गेलेले हे सर्वाधिक वीरता पदक आहेत. दर वर्षी स्वातंत्र्य दिनी देशाची सेवा आणि बलिदानासाठी वीरता पुरस्काराची घोषणा केली जाते. 

रात्रभर लढत होते जवानपाण्याचा वेगवान प्रवाह आणि त्यात चीनी सैनिकांनी केलेला पाठीत वार या परिस्थितीतही भारतीय जवानांनी शौर्य गाजवले होते. शस्त्रास्त्रांचा वापर न करता चिनी सैनिकांसोबत या जवानांनी तब्बल 17 ते 20 तास लढाई केली. चीनी सैनिकांनी दगड, लोखंडी काटेरी जाळ्या असलेले रॉड आदींनी हल्ला केला होता. रक्तबंबाळ झाले तरही या जवानांनी चिनी सैनिकांना चोख प्रत्यूत्तर दिले. या झटापटीत आपले 20 जवान शहीद झाले. 

1380 पदके कोणासाठी...यावेळी 1380 पदके दिली जाणार आहेत. यामध्ये वीरतेसाठी राष्ट्रपतींचे 2 पोलीस पदक, वीरतेसाठी 628 पोलीस पदक, विशिष्ट सेवेसाठी 88 राष्ट्रपती पोलीस पदक आणि उत्कृष्ट सेवेसाठी 662 पोलीस पदक देण्यात येणार आहेत. 628 पोलीस पदकांपैकी जम्मू-कश्मीर 256, सीआरपीएफला 151, आयटीबीपीला 23 वीरता पुरस्कार दिले जाणार आहेतय याशिवाय ओडिशा पोलीस 67, महाराष्ट्र पोलीस 25 आणि छत्तीसगड पोलिसांना 20 पुरस्कार दिले जाणार आहेत.

टॅग्स :ladakhलडाखIndian Armyभारतीय जवानindia china faceoffभारत-चीन तणावIndependence Dayस्वातंत्र्य दिन