शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Ind Vs Pak : आम्ही सर्व तुझ्यासोबत, मोहम्मद शमीच्या ट्रोलर्संना राहुल गांधांनी चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 22:17 IST

पाकिस्ताननं दुबईच्या स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताचा १० विकेट्सनं पराभव केला. सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी सपशेल फोल ठरली.

ठळक मुद्दे‘मोहम्मद शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. लोकांची मने घृणेने भरलेली असतात कारण त्यांना कोणी प्रेम दिलेलंच नसतं. त्यांना माफ करुन टाक.’, असे ट्विट राहुल गांधींनी केलंय. 

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की, दोन्ही संघांवर अत्यंत दबाव असतो. दोन्ही संघातील खेळाडूंना अपेक्षांचं ओझं घेऊनच खेळावं लागत. कारण, दोन्ही देशाताली नागरिकांना विजय हवाच असतो. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशामधील तणावाचे संबंध यास कारणीभूत असतात. त्यातच, भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच पाकिस्तान विरोधात पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे, भारतीय चाहते नाराज झाले असून काहींनी मोहम्मद शमीला ट्रोल करण्या सुरुवात केलीय. मात्र, आता काँग्रेस नेते राहुल गांधीच शमीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.   

पाकिस्ताननं दुबईच्या स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताचा १० विकेट्सनं पराभव केला. सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी सपशेल फोल ठरली. भारतीय संघाच्या मानहानीकारक पराभवावर सोशल मीडियात टीम इंडियाविरोधात ट्रोलर्स चांगलेच सक्रीय झाले असून गोलंदाजांना लक्ष्य केलं जात आहे. मुख्यत्वे मोहम्मद शमीला ट्रोल केलं जात आहे. त्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली जात आहे. ट्रोलर्सच्या या भाषेवर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ते शमीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधींनीही शमीचा पाठबळ देण्याचं काम केलंय.‘मोहम्मद शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. लोकांची मने घृणेने भरलेली असतात कारण त्यांना कोणी प्रेम दिलेलंच नसतं. त्यांना माफ करुन टाक.’, असे ट्विट राहुल गांधींनी केलंय.  फेसबुकवरुनही राहुल गांधीनी आपल मत व्यक्त करत, ट्रोलर्संना सुनावलंय. 

शमीच्या समर्थनार्थ आले क्रिकेटर्स

समालोचक हर्षा भोगले यांनीही शमीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. "जे लोक शमीबाबत वाईट बोलत आहेत. त्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही क्रिकेट पाहणं सोडून द्या. तुमची कमतरता कधीच जाणवणार नाही", असं रोखठोक विधान हर्षा भोगले यांनी केलं आहे. भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण, सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनीही ट्रोलर्सला खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. "मीही त्याच भारत-पाकिस्तान सामन्याचा एक भाग आहे की जिथं भारताला पराभवला सामोरं जावं लागलं होतं. हे मी काही वर्षांपूर्वीचं वातावरण सांगू इच्छितो. त्यावेळी मला कुणीच असं पाकिस्तानात निघून जा वगैरे बोललं नव्हतं. सध्या जो मुर्खपणा सुरू आहे तो लगेच थांबवायला हवा", असं इरफान पठाण म्हणाला.  

टॅग्स :Mohammad Shamiमोहम्मद शामीRahul Gandhiराहुल गांधीIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानTwitterट्विटर