शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीच्या उल्लेखानंतर सत्ताधारी-विरोधकांत जुंपली; ‘नीट’, मणिपूरच्या प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 07:49 IST

‘नीट’, मणिपूरच्या प्रश्नावरून केंद्र सरकारला घेरण्याचा ‘इंडिया’चा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आणीबाणीचा उल्लेख केला तेव्हा सत्ताधारी पक्षाने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधला, तर मुर्मू यांनी आपल्या भाषणात तरुण आणि ईशान्येचा उल्लेख केला, तेव्हा विरोधी सदस्यांनी ‘नीट’ परीक्षेतील कथित हेराफेरी आणि मणिपूरसारख्या मुद्द्यांवर सरकारला फटकारले. सुमारे ५५ मिनिटांच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तब्बल १८० वेळा बाकडे वाजवले, तर विरोधी सदस्यांनीही प्रत्युत्तराची एकही संधी सोडली नाही. 

राष्ट्रपतींनी आणीबाणीचा उल्लेख केल्यावर सत्ताधारी पक्षाने सर्वाधिक काळ बाकडे वाजवली. यावेळी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ‘शेम’ ‘शेम’च्या घोषणा दिल्या. त्यावेळी विरोधी सदस्य आपापल्या जागेवर शांतपणे बसले. मात्र, काही सदस्य आज अघोषित आणीबाणी आहे, असे म्हणताना ऐकू आले.

आपचा अभिभाषणावर बहिष्कार आम आदमी पक्षाच्या (आप) संसद सदस्यांनी त्यांच्या पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला तसेच संसद परिसरात आंदोलनही केले.

संसदेत विरोधकांडून दररोज ‘नीट’च्या घोषणाविरोधकांनी ‘नीट’ परीक्षेत कथित अनियमिततेचा आरोप केला. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन यांच्यासह द्रमुकचे अनेक सदस्य मोठ्याने ‘नीट-नीट’ म्हणताना ऐकू आले, तर सपा, एनडीए आणि काँग्रेसचे काही सदस्य ‘अग्निपथ’ योजनेचा उल्लेख करताना दिसले.

संसदेत ‘जय संविधान’ म्हणता येत नाही का? देशाच्या संसदेत ‘जय संविधान’ म्हणता येत नाही का? संसदेत असंसदीय आणि असंवैधानिक घोषणा देण्यापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांना रोखण्यात आले नाही; परंतु विरोधी खासदाराने ‘जय संविधान’ म्हटल्यावर आक्षेप घेण्यात आला. निवडणुकीच्या वेळी समोर आलेला राज्यघटना विरोधीवाद आता नव्या स्वरूपात समोर येत आहे. - प्रियांका गांधी, काँग्रेस नेत्या.

टॅग्स :lok sabhaलोकसभाEducation Sectorशिक्षण क्षेत्रManipur Violenceमणिपूर हिंसाचारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी