शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक हवामान दिन विशेष : वाढत्या तापमानाचा अन्टार्टिकामधील बर्फावर मोठा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 20:42 IST

जगभरातील तापमान वाढीचा परिणाम अन्टार्टिकामधील हिमशिखरे आणि बर्फाच्छादीत भागावर सातत्याने होत आहे.

जयंत धुळपअलिबाग- जगभरातील तापमान वाढीचा परिणाम अन्टार्टिकामधील हिमशिखरे आणि बर्फाच्छादीत भागावर सातत्याने होत असल्याचा निष्कर्ष अन्टार्टिकामधील एक्स्पीडीशनवर असलेले अलिबाग भूचूंबकिय वेधशाळेतील संशोधक सुदर्शन पात्रो यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतला.स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवरील नैसर्गिक बदलांशी संबधीत असतो याच सुत्रस धरुन बर्फाच्छादित अन्टार्टिका बेटावर तपामानासह अन्य हवामान विषयक घटकांचा अभ्यास करण्याकरिता जगभरातील विविध देशातील संशोधक व अभ्यासकांच्या संशोधन मोहिमा त्यात्या सरकारच्या माध्यमातून दरवर्षी जात असतात. भारताचे स्वत:चे भारती हे संशोधन केंद्र अन्टार्कटिका येथे कायमस्वरुपी असून तेथे सद्यस्थितीत अलिबाग भूचूंबकिय वेधशाळेतील संशोधक सुदर्शन पात्रो हे संशोधन करित आहेत. तपामानात विक्रमी तफावत, तपमान सुसह्यीकरणाअंती अन्टार्टिकात दाखलमॅग्नेटोमिटरच्या माध्यमातून पृथ्वीच्या चुंबकीय स्थित्यंतराच्या नोंदी घेवून त्यांचा अभ्यास आमच्या पथकाकडून सुरु असल्याची माहिती सुदर्शन पात्रो यांनी दिली. अन्टार्टिका येथे सध्या असलेले उणे 12  डीग्री तापमान आणि आपल्या देशातील उच्च तापमान असा मोठा फरक येथे आहे. अन्टार्टिकामधील विक्रमी कमी तापमानात जावून, राहून संशोधन कार्यकरण्याकरिता येथे येण्यापूर्वी उत्तराखंड राज्यातील उली या 11 हजार फूट उंचीवरील बर्फाच्छादित क्षेत्रात राहून तपमान सुसह्यीकरण केल्यावर आम्ही येथे दाखल झालो. भारतीय संशोधक चमू बरोबरच रशिया व चिन चे संशोधक देखील येथे असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितलं. 

हवामानाच्या नोंदीच्या देवाणघेवाणीला जागतिक स्तरावर प्राधान्य हवामानातील अनपेक्षीत बदलांमुळे मानवी साधनसंपत्तीचे तर नुकसान होतेच; शिवाय अनेकांचा मृत्यूही ओढवतो. इतर प्राणी-पक्षीही यातून सुटत नाही. हवामानावर लक्ष ठेवणारी ‘वर्ल्ड वेदर वॉच’ ही प्रणाली आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्यरत आहे. हवामानातील बदल, त्यामागील कारणो व उपाय याबाबी सरकारपासून सर्वसामान्यंपर्यंत प्रत्येकाने समजून घेण्याची तातडीची गरज निर्माण झाली आहे.सन 1950 साली जागतिक हवामानशास्त्न संघटना स्थापन झाली. ही संस्था स्थापन होण्यासाठी पुढाकार घेण्याऱ्या 31 देशांत भारताचा देखील समावेश आहे.  स्थानिक हवामानाचा संबंध जागतिक पातळीवरील नैसर्गिक बदलांशी असतो संशोधनातून स्पष्ट झाल्यावर,जगातल्या सर्व देशांमध्ये केल्या जाणाऱ्या हवामानाच्या नोंदीच्या देवाणघेवाणीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

फोटो सौजन्य- अलिबाग भूचूंबकिय वेधशाळेतील संशोधक सुदर्शन पात्रो (थेट अन्टार्टिकातून)