शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात आयएसचा वाढता प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 06:53 IST

काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटचा नगण्य प्रभाव असल्याचा पोलिस दावा करीत असले तरी या संघटनेचा तेथील लोकांवरील प्रभाव आणि पसाराही वाढत असल्याचे तेथील घटनांवरुन दिसते.

नवी दिल्ली/श्रीनगर : काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटचा नगण्य प्रभाव असल्याचा पोलिस दावा करीत असले तरी या संघटनेचा तेथील लोकांवरील प्रभाव आणि पसाराही वाढत असल्याचे तेथील घटनांवरुन दिसते.पुलवामाच्या पंझगाम भागातील असीफ नझीर दार हा स्थानिक रहिवासी आणि त्याच्या मित्रांना सभ्य आणि धार्मिक व्यक्ती म्हणून माहिती होता. अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडलेला दार कधीही रस्त्यांवरील निदर्शनांत सहभागी नसायचा. मात्र, दार याचा मृतदेह ८ सप्टेंबर रोजी श्रीनगरच्या काश्मीर विद्यापीठ परिसराच्या बाहेर सापडला.हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर रियाझ नायकू याच्या आदेशावरून दार याची हत्या केली गेली, असे काही संदेश इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेल्या समाजमाध्यमांवर होते. तथापि, दुसऱ्या दिवशी असा संदेश त्यावर पोस्ट केला गेला की, दार याची हत्या ‘भारतीय संस्थांनी’ केली. नंतरच्या संदेशाला दुजोरा देताना जम्मू आणि काश्मीरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दार हा इस्लामिक स्टेटच्या विचारांनी प्रभावित झालेला व काश्मीर खोºयात मारला गेलेला दहावा अतिरेकी होता, असे म्हटले. समाज माध्यमावर पोस्ट झालेल्या त्याच्या छायाचित्रात त्याच्या हाती अत्याधुनिक शस्त्र दिसते व त्याच्या मागे इस्लामिक स्टेटचा झेंडा दिसतो. काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेटचा प्रभाव असलेल्यांची संख्या एक आकडी असल्याचा व अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेत काळे झेंडेच फडकवले जात असल्याचा पोलिसांचा दावा ताज्या मृत्यूमुळे संशयास्पद ठरला आहे.अन् पोलीस म्हणतात...पोलिसांच्या माहितीनुसार दार ऊर्फ अबू अन्वर अल-काश्मिरी हा आयएसजेकेचा तिसरा आमिर (प्रमुख) होता.त्या आधी गेल्या मार्च महिन्यात एईसा फाझील आणि गेल्या जूनमध्ये दाऊद अहमद सोफी हे अतिरेकी मारले गेले होते.हिजबुलच्या तुलनेत इस्लामिक स्टेटने प्रभावित झालेल्यांची संख्या खोºयात कमी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरISISइसिसterroristदहशतवादी