शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

देशातील वाढत्या हॉटस्पॉटस्मुळे केंद्राची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 05:51 IST

केंद्र व राज्यांत समन्वयाने सुरू आहे काम

नवी दिल्ली : राज्यांमध्ये कोरोना विषाणूची (कोविड-१९) साथ फैलावणारी केंद्रे (हॉटस्पॉटस्) वाढत चालल्याबद्दल केंद्र सरकारची काळजी वाढली आहे. सगळ्या सीमा बंद करणे आणि फार मोठ्या लोकसंख्येला सगळ्यांपासून वेगळे करण्याचा अनुभव राज्याच्या यंत्रणेसाठी नवीन आहे. एवढेच काय केंद्र सरकारसाठीदेखील देश व्यापलेल्या या संकटाला हाताळण्यासाठी नवी व्यूहरचना करणे हे नवेच आव्हान आहे.केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी म्हटले की, १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत असे ११५० हॉटस्पॉटस पसरले असून ते शुक्रवारी बंद केले गेले आहेत.आधी एखादा भाग हा हॉटस्पॉट आहे की नाही हे ठरवण्याचा निकष होता तो १०० रुग्णांचा. पंरतु, पुरेशा चाचण्या (टेस्टींग) केल्या जाऊ शकलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती असल्यामुळे १०० ची संख्या १० वर आणण्यात आली आहे. ते भाग आधी बंद करणे हा उत्तम मार्ग आहे. फार मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला त्या भागांच्या आत ठेवून त्यांची सखोल चाचणी केली जावी. आता अँटीबॉडी टेस्टींग मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.दिल्लीत कोविड-१९ ची साथ पसरवणारे काही विभाग घरांच्या दोन रांगांएवढे लहान आहेत तर राजस्थानमधील भीलवाडात तर २० लाखांपेक्षा जास्त लोक २० मार्चपासून लॉकडाऊन केले गेलेले आहेत.च्महाराष्ट्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत असे ४०० पेक्षा जास्त तर उत्तर प्रदेशमध्ये १०५ हॉटस्पॉटस् आहेत. मुंबई शहर देशातील सगळ्यात मोठे शहर आहे. तमिळनाडूत असे हॉटस्पॉटस् २२२, आंध्र प्रदेशमध्ये १२० पेक्षा जास्त तर तेलंगणामध्ये १२५ आहेत.च्मध्यप्रदेशमध्ये १८० हॉटस्पॉटस्च्या माध्यमातून कोविड-१९ ने शिरकाव करणे हा आश्चर्याचा विषय आहे. या हॉटस्पॉटस्वर केंद्र आणि राज्य सरकारे पूर्णपणे समन्वयाने २४ तास काम करत आहेत. हा विषाणू रोखण्यास या हॉटस्पॉटस्ना हाताळण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या मार्गांनी काम करत आहे व रहिवाशांना सगळ्या सवलतीही देत आहे. या हॉटस्पॉटस्वर २४ तास ड्रोन्स व सीसीटीव्हींचीही नजर आहे....म्हणूनच लॉकडाऊन वाढवावे लागणारच्स्वच्छता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेष तुकडी आणि स्थानिक अधिकारी प्रत्येक घरी जात आहेत. मुंबईत हॉटस्पॉटस्च्या संख्येत दोन अंकी वाढ होऊन ते ३८० वर गेल्यामुळे यंत्रणांना धक्का बसला. हॉटस्पॉटस्च्या संख्येमुळेच केंद्र आणि राज्य सरकारांना लॉकडाऊनचा कालावधी वाढवणे भाग पडले आणि पडणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या