वित्तमंत्रालयाचे संकेत : पर्यटनाला चालना मिळणार, दरवर्षीचा प्रवासभत्ता होणार करमुक्तनवी दिल्ली : सध्या दोन वर्षांतून एकदा करमुक्त असलेला एलटीए (लीव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स) प्रत्येक वर्षासाठी करमुक्त करण्याचे संकेत केंद्रीय वित्तमंत्रालयाने दिले आहेत. पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. येत्या २८ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यासंदर्भात घोषणा होण्याची अपेक्षा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासाच्सध्या केवळ प्रवासखर्चापुरती मर्यादित असलेली व्याप्ती हॉटेल व प्रवासादरम्यानचा अन्य खर्च यांच्या समावेशाने वाढविण्याचा विचार आहे. च्प्रथम वर्ग रेल्वेच्या तिकीटपर्यंतचा सुटीकालीन प्रवास भत्ता लागू असलेल्या लोकांच्या मर्यादेत ही वाढ विमानाच्या इकोनॉमी क्लासपर्यंत नेण्याचा विचार.एलटीएबाबत निर्णय झाल्यास याचा थेट परिणाम हा पर्यटनाला चालना मिळण्याच्या रूपाने दिसेल, असे मानले जात आहे.प्राप्तिकराची मर्यादा तीन लाख कराच्सामान्य करदात्याच्या हाती अधिक पैसा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारने प्राप्तिकराच्या सध्याच्या अडीच लाखांपर्यंतच्या मर्यादेत ५० हजार रुपयांची वाढ करीत ती तीन लाख रुपये करण्याची मागणी ‘असोचेम’ने केली आहे. च्गृहकर्जावर मिळणाऱ्या प्राप्तिकरातील वजावटीत पाच लाख रुपये इतकी वाढ करण्याची मागणी आहे.
अर्थसंकल्पात ‘एलटीए’ची मर्यादा वाढवणार
By admin | Updated: February 20, 2015 02:26 IST