शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

महाराष्ट्रात बाल लैंगिक शोषणाच्या तक्रारींमध्ये वाढ; केंद्राची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 04:21 IST

महाराष्ट्रात लैंगिक शोषणाच्या तक्रारीत गेल तीन वर्षात वाढ दिसून आली आहे. कपिल पाटील यांनी यासंबंधी लेखी प्रश्न विचारला.

नवी दिल्ली: मोठ्या प्रमाणावर जागरूकता कार्यक्रम राबवणे, शिवाय कठोर कायद्याचा परिमाण दिसला नाही. महाराष्ट्रात लैंगिक शोषणाच्या तक्रारीत गेल तीन वर्षात वाढ दिसून आली आहे. कपिल पाटील यांनी यासंबंधी लेखी प्रश्न विचारला. केंद्र सरकारच्या उत्तरामुळे महाराष्ट्रात अशा तक्रारीत सातत्याने वाढ आढळली.२०१६ साली महाराष्ट्रात १४ हजार ५५९ तक्रारींची नोंद झाली. पुढच्या वर्षी त्यात वाढ होऊ न आकडा १६ हजार ९१८ वर पोहोचला. २०१८ साली १८ हजार ८९२ तक्रारी पोलिसांकडे आल्या. अर्थात अनेक प्रकरणांची तक्रारच केली जात नसल्याने हा आकडा जास्त होता. केंद्रीय दूरसंचार मंत्रालय, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने कायदा कठोर केला आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफीवर निर्बंध आहेत. असे व्हिडीओ पाहणे, सोशल मीडियावर पाठवणे गुन्हा आहे. पालकांना जागरूक केले जात आहे. मात्र त्याचा परिणाम अद्याप दिसला नाही.>दूध भेसळ चिंताजनक : दूध व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ गंभीर मुद्दा आहे. राहुल शेवाळे यांनी यासंबंधी केंद्र सरकारला लेखी प्रश्न विचारला. २०१६ साली महाराष्टातून १८१७ नमुने गोळा केले होते. त्यापैकी ३५९ नमुने भेसळयुक्त होते. दिल्लीत ८ पैकी एका नमुन्यात भेसळ होती. प्रमुख कंपन्यांच्या उत्पादनांची तपासणी केली. त्यात ६ हजार ४३२ नमुन्यांपैकी ४० टक्के नमुने भेसळयुक्त आढळले.>महाराष्ट्रातील जंगलात आगी : जंगलात लागणाऱ्या आगी रोखण्यात केंद्राला यश आले नाही. प्रताप जाधव यानी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरामुळे आकडेवारीच समोर आली आहे. महाराष्ट्रातील आगीच्या संख्या तशीच आहे.२०१७ साली ५८८९, पुढच्या वर्षी ३४९० तर मागील वर्षी ३२२१ वेळा आगी लागल्या. त्यात अनुक्रमे ४२, ५० व ५४ लाखांची वनसंपदा जळाली.>सूरजकुंड मेळ्यात १५०० कारागीर : देश व सार्क राष्ट्रांमधील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ सूरजकुंड मेळा असल्याचे केंद्राने म्हटले आहे. डॉ. हीना गावित व सुनील तटकरे यांनी प्रश्न विचारला होता. सूरजकुंड मेळ््यात यंदा १५०० कारागीर सहभागी झाले. त्यात १३४४ भारतीय तर सार्क राष्ट्रांमधील ३१ कलाकार होते.>जाहिरातीचे कठोर नियम : अल्पवयीन मुलांना आकर्षीत करण्यासाठी अनेक दुकानांमध्ये तंबाखू, सिगरेट व तत्सम पदार्थांच्या जाहीराती, पॅकेट्स लटकवण्यात येतात का, असा प्रश्न अरविंद सावंत व कृपाल तुमाने यांनी विचारला. आरोग्य मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेत विस्तृत्त उत्तर दिले. तंबाखू, सिगरेट, गुटख्याच्या जाहीरातीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ज्याचे उल्लंघन खपवून घेतले जात नाही, असे केंद्राने म्हटले आहे.