शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 22:56 IST

income tax raid : या छापेमारी दरम्यान ४० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : आयकर विभागाने शनिवारी बूट बनवणाऱ्या व्यावसायिकांवर मोठी कारवाई केली. आग्रा आणि दिल्लीसह उत्तर प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये व्यावसायिकांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले. या छापेमारी दरम्यान ४० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बूट व्यापारी कर चुकवत असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. 

यानंतर दुपारी ३ वाजता आयकर विभागाचे अधिकारी तिन्ही कंपन्याच्या शोरूममध्ये पोहोचले आणि खरेदीसाठी आलेल्या लोकांना बाहेर काढून छापेमारी सुरू केली.  सध्या छापेमारी सुरू असून अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.  आयकर विभागाचे पथक फाइल्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करत आहे. तासभर चाललेल्या या छाप्यात आतापर्यंत ४० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पलंगाखाली नोटांचे बंडल लपवून ठेवले होते. हे पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत.

दुसरीकडे, आयकर विभागाने शनिवारी अहमदाबाद आणि वडोदरा येथील माधव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या ठिकाणी छापे टाकले. रिअल इस्टेट आणि सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी प्रसिद्ध असलेल्या समूहाच्या दोन्ही शहरांतील २७ ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. शनिवारी सकाळपासून सुरू झालेला हा छापा अजूनही सुरूच आहे. अधिकारी त्याच्या व्यवहारांची चौकशी करत आहेत. आयकर विभागाचे ५० हून अधिक अधिकारी छापे टाकत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडोदरा येथील सुभानपुरा येथील समूहाच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते. कर्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्रात अस्तित्व असलेल्या माधव ग्रुपची २०१० मध्ये स्थापना झाल्यापासून चौकशी सुरू आहे. हा समूह ऊर्जा, रिअल इस्टेट, महामार्ग आणि शहरी पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रात कार्यरत आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIncome Taxइन्कम टॅक्सraidधाड