शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Income Tax Raid : आयकर विभागाची मोठी कारवाई, देशातील 50 ठिकाणी छापेमारी; काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 11:16 IST

Income Tax Raid : करचुकवेगिरीप्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसायिक आयकर रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे. जयपूरमध्येही व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : देशभरात विविध ठिकाणी आयकर विभागाची (Income tax department) कारवाई सुरु आहे. आज राजकीय फंडिंग प्रकरणी आयकर विभागाकडून देशभरात 50 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीपासून उत्तराखंड आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये आयकर विभागाची पथके पोहोचली आहेत. करचुकवेगिरीप्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसायिक आयकर रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे. जयपूरमध्येही व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत.

राजस्थानमध्ये माध्यान्ह भोजनातून कमाई करणाऱ्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये गृह राज्यमंत्री असलेल्या राजेंद्र यादव आणि मिड डे मील बिझनेस ग्रुपवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मंत्री राजेंद्र यादव यांचा कोतपुतळी येथे पोषण आगार कारखाना आहे. दरम्यान, आतापर्यंत आयकर विभागाची पथके 50 हून अधिक ठिकाणी पोहोचली आहेत. 

या छापेमारीत 300 हून अधिक पोलिसांचा सहभाग आहे. आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये 100 वाहनेही वापरली जात आहेत. जयपूर जिल्ह्यातील कोतपुतळी इथेही छापे टाकण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या जवानांनाही सोबत घेतले आहे. राजस्थानसोबतच दिल्ली, महाराष्ट्र, उत्तराखंडमध्येही छापेमारी सुरु आहे.

बंगळुरू-मुंबईतही छापेमारीबंगळुरूमध्येही आयकर विभागाच्या छाप्यांची माहिती समोर आली आहे. मणिपाल ग्रुपवरही आयकर विभागाने छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळुरूमध्ये 20 हून अधिक ठिकाणी आयकर विभागाचा शोध सुरू आहे, सर्वांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत. मिड डे मिल घोटाळा प्रकरणी मुंबईतही आयकर विभागाचे छापे सुरू आहेत. येथे आयकर विभागाची पथके 4-5 ठिकाणी छापे टाकत आहेत. आयकर विभागाला काही विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर छापे टाकण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

गेल्या महिन्यात महाराष्ट्रात छापेमारीदरम्यान, गेल्या महिन्यात महाराष्ट्रात  24 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यावेळी 48 वाहनं आणि 50 अधिकारी होते. यामध्ये पंढरपूरमधील उद्योजक अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्याशी निगडित असलेल्या तीन साखर कारखान्यांवर देखील आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. तसेच सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्स्ट्रक्टवर धाडी टाकल्या होत्या. सोलापुरात सात ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रावर व्यक्ती रडारवर होते. कृषी पाहणी शिबीरासाठी आलो असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या होत्या.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाड