शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Income Tax Raid : उत्पन्न कमी दाखवून कर वाचवण्याचा प्रयत्न; बीबीसीबाबत आयकर विभागाची मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 18:29 IST

Income Tax Raid : तीन दिवसानंतर आयकर विभागाचे बीबीसी कार्यालयातील सर्वेक्षण पूर्ण झाले.

Income Tax Raid : ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात आयकर विभागाचे सर्वेक्षण तीन दिवसांनंतर पूर्ण झाले. यानंतर या कारवाईबाबत आयकर विभागाने खुलासा केला असून, अधिकृत निवेदनही समोर आले आहे. आयकर कायदा, 1961 (अधिनियम) च्या कलम 133A अंतर्गत एक सर्वेक्षण ऑपरेशन बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये करण्यात आल्याचे आयकर विभागाने सांगितले. 

बीबीसीच्या कार्यालयातून काय सापडले?आयकर विभागाने असेही सांगितले की, सर्वेक्षणादरम्यान बीबीसी ग्रुपने कमी उत्पन्न दाखवून कर वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागाने म्हटले की, सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, विविध भारतीय भाषांमध्ये (इंग्रजी व्यतिरिक्त) कंटेटचा पुरेसा वापर असूनही, समूहाने दाखवलेले उत्पन्न किंवा नफा कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नसल्याचे म्हटले आहे. 

कर्मचार्‍यांची विधाने, डिजिटल पुराव्यावर आधारित खुलासेसर्वेक्षणादरम्यान बीबीसीच्या ऑपरेशनशी संबंधित विभागाने गोळा केलेले पुरावे हे स्पष्टपणे दर्शवतात की, बीबीसीच्या परदेशी युनिट्सद्वारे नफ्याचे अनेक स्त्रोत होते, ज्यावर भारतातील कर भरला गेला नाही. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, परदेशात आणि देशात असे अनेक कर्मचारी आहेत, ज्यांचे पेमेंट भारतीय युनिटने केले होते आणि त्यावर कर भरला नाही. बीबीसी कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट, डिजिटल पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे ही सर्व आर्थिक अनियमितता उघड झाली आहे. 

 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सraidधाडMumbaiमुंबईNew Delhiनवी दिल्ली