शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बेनामी 'माया' जप्त; मायावतींच्या भावाच्या ४०० कोटींच्या जमिनीवर टाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 13:51 IST

बेनामी जमिनीवर प्राप्तिकर विभागाची कारवाई

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागानं बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांचे भाऊ आणि पार्टीचे उपाध्यक्ष आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नीविरोधात मोठी कारवाई केली आहे. प्राप्तिकर विभागानं कुमार यांची बेनामी जमीन जप्त केली आहे. या जमिनीची किंमत तब्बल ४०० कोटी रुपये इतकी आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा भागात ही जमीन आहे. मायावतींचा भाऊ आनंद कुमार यांच्या संपत्तीचा तपास प्राप्तिकर विभागाकडून केला जात होता. नोएडामध्ये आनंद कुमार यांची बेनामी जमीन असल्याचं तपासातून समोर आलं. सात एकरवर पसरलेल्या या जमिनीचं मूल्य ४०० कोटींच्या घरात आहे. आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्र लता यांच्या मालकीची बेनामी जमीन जप्त करण्याचे आदेश १६ जुलैला दिल्लीतील बेनामी संपत्ती विरोधी विभागानं दिले होते. यानंतर आज प्राप्तिकर विभागानं जप्तीची कारवाई केली. आनंद कुमार यांच्या आणखी बेनामी संपत्तींची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी केला. येत्या काळात आनंद कुमार यांच्या आणखी संपत्तींवर टाच आणली जाऊ शकते, असे संकेतदेखील सूत्रांनी दिले. आनंद कुमार यांच्यावरील कारवाईची झळ मायावतींपर्यंत पोहोचू शकते. या प्रकरणी प्राप्तिकर विभागासोबतच सक्तवसुली संचलनालयाकडूनदेखील चौकशी सुरू आहे. प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मायावतींचे भाऊ आनंद कुमार यांच्या १,३०० कोटी रुपयांच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. २००७ ते २०१४ या कालावधीत आनंद कुमार यांची संपत्ती तब्बल १८ हजार पटीनं वाढल्याचा प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांचा दावा आहे. २००७ मध्ये आनंद कुमार यांच्याकडे ७.१ कोटींची संपत्ती होती. २०१४ मध्ये ती थेट १,३०० कोटींवर जाऊन पोहोचली. आनंद कुमार संचालक असलेल्या १२ कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. 

टॅग्स :mayawatiमायावतीIncome Taxइन्कम टॅक्स