शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा 8 लाख; समितीची शिफारस मान्य करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 06:01 IST

EWS Reservation: केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती. आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) निश्चित करण्यासाठी कौटुंबिक उत्पन्न हा व्यवहार्य निकष आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  तीन सदस्यांच्या समितीने  आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) निश्चित करण्यासाठी एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांची कायम ठेवण्यासंबंधी  केलेली शिफारस मान्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली.

आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) निश्चित करण्यासाठी कौटुंबिक उत्पन्न हा व्यवहार्य निकष आहे आणि सद्य: स्थितीत ईडब्ल्यूएस घटक ठरविण्यासाठी वार्षिक कौटुंबिक ८ लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा रास्त आहे, अशी शिफारस समितीने केल्याचे सरकारने म्हटले आहे.नीट-पीजी प्रवेशासंबंधी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञा पत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की,  समितीने अशी शिफारस केली आहे की,  ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये आहे, ती कुटुंबेच ईडब्ल्यूएसचे लाभ मिळण्यासाठी पात्र असतील.

केंद्र सरकारच्या वतीने सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे सचिव आर. सुब्रमण्यम यांनी प्रतिज्ञा पत्र दाखल केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मी सन्मानपूर्वक निवेदन करतो की,  नवीन निकष लागू करण्यासह  समितीच्या शिफारशी मान्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  ईडब्ल्यूएस घटक निश्चित करण्यासाठीच्या निकषांचा फेरविचार करण्यासंबंधी केंद्र सरकारने न्यायालयाला आश्वासन दिले होते. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी सरकारने  अजय भूषण पांडेय ( माजी वित्त सचिव), व्ही. के. मल्होत्रा ( सदस्य सचिव, आयसीएसएस) आणि संजीव संन्याल (केंद्राचे प्रधान आर्थिक सल्लागार) यांचा समावेश असलेली तीन सदस्यांंची समिती स्थापन केली होती.

काय म्हटले होते समितीने अहवालात...    मागच्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी समितीने केंद्र सरकारकडे अहवाल सुपूर्द केला होता. ईडब्ल्यूएससाठी सध्या  ८ लाख रुपयांची वार्षिक कौटुंबिक उत्पनाची मर्यादा किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवावी, असे समितीने अहवालात म्हटले होते. म्हणजे, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न  ८ लाख रुपये आहे, अशी कुटुंबे  ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या लाभासाठी पात्र असतील.   

टॅग्स :reservationआरक्षण