आरजी डिझायनर स्टुडिओचे उद्घाटन
By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST
नाशिक : हजारो नाशिककरांच्या उपस्थितीत अभिनेत्री सई ताम्हणकरने आरजी स्टुडिओचे उद्घाटन केले. आपला अभिनय आणि स्टाइल स्टेटमेंटसाठी सई ताम्हणकर अवघ्या तरुणांसाठी फॅशन आयकॉन बनली आहे. फक्त पुरुषांसाठी सर्व प्रकारचे पोशाख अत्यंत वाजवी दरात नाशिकमध्ये आरजी डिझायनर स्टुडियोने उपलब्ध करून दिले आहेत. उल्हासनगरस्थित राजेश आणि गिरीश चोईथमराणी या उद्योजक बंधूंनी आपले अकरावे शोरूम नाशिकमध्ये सुरू केले त्याचे उद्घाटन सई ताम्हणकरच्या हस्ते शनिवारी झाले. नाशिकचे नवे रुप खूप आश्वासक आहे अशा शब्दात सईने आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्घाटनाच्या दिवशी सकाळपासूनच आरजी डिझायनर स्टुडिओला ग्राहकांचा ओघ सुरू होता. उद्घाटनानिमित्त २३ ऑगस्टपर्यंत बाय टु गेट वन फ्री योजनेचा पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. या कार्यक्रमाला आमदार सीम्
आरजी डिझायनर स्टुडिओचे उद्घाटन
नाशिक : हजारो नाशिककरांच्या उपस्थितीत अभिनेत्री सई ताम्हणकरने आरजी स्टुडिओचे उद्घाटन केले. आपला अभिनय आणि स्टाइल स्टेटमेंटसाठी सई ताम्हणकर अवघ्या तरुणांसाठी फॅशन आयकॉन बनली आहे. फक्त पुरुषांसाठी सर्व प्रकारचे पोशाख अत्यंत वाजवी दरात नाशिकमध्ये आरजी डिझायनर स्टुडियोने उपलब्ध करून दिले आहेत. उल्हासनगरस्थित राजेश आणि गिरीश चोईथमराणी या उद्योजक बंधूंनी आपले अकरावे शोरूम नाशिकमध्ये सुरू केले त्याचे उद्घाटन सई ताम्हणकरच्या हस्ते शनिवारी झाले. नाशिकचे नवे रुप खूप आश्वासक आहे अशा शब्दात सईने आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्घाटनाच्या दिवशी सकाळपासूनच आरजी डिझायनर स्टुडिओला ग्राहकांचा ओघ सुरू होता. उद्घाटनानिमित्त २३ ऑगस्टपर्यंत बाय टु गेट वन फ्री योजनेचा पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. या कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, उपमहापौर गुरमित बग्गा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आरजी डिझायनर स्टुडिओचे संचालक राजेश, गिरीश चोईथरामाणी आणि जवाहर धामेजा यांनी स्वागत,तर आनंद क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले.कॅप्शनकॉलेजरोड येथील आरजी डिझायनर स्टुडिओचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी डीवीकडून संचालक राजेश चोईथरामानी, सिमरन चोईथरामानी, सई ताम्हणकर, दीपिका चोईथरामानी, गिरीश चोईथरामानी आदि.