शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

स्वदेशी सुपरसॉनिक विमानावर हनुमान, मोदींच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 08:04 IST

शेपटीवर लिहिलेय ‘वादळ येत आहे’; बंगळुरात आशियातील सर्वात मोठ्या एरोस्पेस प्रदर्शनाला सुरुवात

बंगळुरू : येथील येलाहंका हवाई दलाच्या संकुलात १४व्या ‘एरो इंडिया’ प्रदर्शनाला सोमवारी सुरुवात झाली. हा एअर शो पाच दिवस चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे उद्घाटन केले. स्वदेशी सुपरसॉनिक विमान एचएलएफटीने या शोमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या शेपटीवर हनुमानाचे छायाचित्र आहे. यासोबतच एक मेसेजही लिहिला आहे, वादळ येत आहे.

उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पूर्वी हा फक्त एअर शो होता, पण आता तो भारताची ताकद म्हणून समोर येत आहे. कोरोनाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच प्रेक्षकही या शोमध्ये सहभागी होत आहेत. मोदी म्हणाले की, संरक्षण उत्पादनातील गुंतवणुकीसाठी भारत हे एक आकर्षक ठिकाण म्हणून सादर करताना अनुकूल आर्थिक धोरणांमुळे देश जागतिक स्तरावर लष्करी उपकरणे निर्यात करणारा आघाडीचा देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल.

मोदी म्हणाले की, भारताने गेल्या आठ-नऊ वर्षांत संरक्षण उत्पादन क्षेत्राचे पुनरुज्जीवन केले आहे आणि ते २०१४ पर्यंत लष्करी उपकरणांची निर्यात १.५ दशलक्ष डॉलरवरून ५ दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्याचा विचार आहे.

मोदी म्हणाले...२१व्या शतकातील नवा भारत कोणतीही संधी सोडणार नाही. दशकांपर्यंत सर्वात मोठा संरक्षण आयातदार असलेला देश जगातील ७५ देशांमध्ये संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे. गेल्या पाच वर्षांत देशाच्या संरक्षण निर्यातीत सहापट वाढून निर्यातीत १.५ अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला. आज ‘एरो इंडिया’ हा केवळ शो नाही, तर ती भारताची ताकद आहे.

प्रदर्शनात दिग्गजांचा सहभाग‘एरो इंडिया’मधील प्रमुख प्रदर्शकांमध्ये एअरबस, बोईंग, डसॉल्ट एव्हिएशन, लॉकहीड मार्टिन, इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री, ब्रह्मोस एरोस्पेस, आर्मी एव्हिएशन, एचसी रोबोटिक्स, एसएएबी, सफारान, रोल्स रॉयस, लार्सन अँड टुब्रो, भारत फोर्ज लिमिटेड यांचा समावेश आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) आणि बीईएमएल लिमिटेडचीही स्टॉल आहेत.

चित्तथरारक प्रात्यक्षिकेnया कार्यक्रमात आयोजित केलेल्या एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाच्या अनेक विमानांनी चित्तथरारक कसरती केल्या. n‘एरो इंडिया’ची थीम ‘द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज’ आहे आणि संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रातील भारताची प्रगती आणि क्षमता प्रदर्शित करण्याचा उद्देश आहे.

७०० कंपन्या सहभागीn पाच दिवस चालणारे हे प्रदर्शन आशियातील सर्वात मोठे मानले जाते. n यामध्ये ७०० हून अधिक भारतीय आणि परदेशी संरक्षण कंपन्या आणि १०० देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. यामध्ये अनेक देशांचे संरक्षण मंत्रीही सहभागी आहेत.

टॅग्स :airforceहवाईदलairplaneविमानNarendra Modiनरेंद्र मोदी