शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड फूड इंडिया-2017 मधील महाराष्ट्र दालनाचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 22:52 IST

नवी दिल्ली : वर्ल्ड फूड इंडिया-2017 मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

नवी दिल्ली : वर्ल्ड फूड इंडिया-2017 मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.अन्न प्रक्रिया उद्योगात नवनवीन संधी शोधली जात आहे. महाराष्ट्रात या क्षेत्रात अग्रेसर असून याचे प्रतिबिंब या महाराष्ट्र दालनात उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फुंडकर यांनी सांगितले.वर्ल्ड फूड इंडिया 2017चे आयोजन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्यावतीने इंडिया गेट येथे करण्यात आले. या ठिकाणी महाराष्ट्र दालन उभारण्यात आलेले आहे. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, कृषी, फलोत्पादन पणन मंत्री राज्यमंत्री सदाशिव खोत, कृषी विभागाचे सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त डॉ. सचेंद्रप्रताप सिंग, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकास रस्तोगी, सचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला, राजशिष्टाचार व गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्रा यासह कृषी, पणन, विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध दालनाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.महाराष्ट्राच्या दालनामध्ये शासनाचे तसेच खासगी अन्न प्रक्रिया उद्योजकांचे एकूण 21 दालने  उभारण्यात आलेली आहेत. खाद्य प्रक्रिया, जास्त काळ टिकविण्यासाठी वापरण्यात येणा-या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली फळे, रस, अन्य पदार्थांचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे. या दालनाचे संकल्पनाचित्र तसेच आतील सजावट जे. जे. स्कूल ऑफ ऑर्टच्या चमूने केलेली आहे.केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे इंडिया गेट येथे 3ते 5 नोव्हेंबरदरम्यान वर्ल्ड फूड इंडिया 2017 प्रदर्शन आणि परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात जगभरातील अन्न प्रक्रिया उद्योग, गुंतवणूकदार, तज्ञ सहभागी झालेले आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक व व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने, वर्ल्ड फूड इंडियाचे आयोजन करण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर, अरमेनिया या देशाचे राष्ट्रपती, तसेच लटविया या राष्ट्राचे प्रधानमंत्री यावेळी उपस्थित होते. या मुख्य कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास तसेच कृषी, फलोत्पादन पणन मंत्री राज्यमंत्री उपस्थित होते.  तीन दिवसांच्या या प्रदर्शनात महाराष्ट्रासह अन्य राज्य सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध राष्ट्र तसेच जगभरातील 2000 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.इज ऑफ डुइंगअंतर्गत महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाचे राष्ट्रीय मंचावरून कौतुकइज ऑफ डुइंगअंतर्गत महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाचे राष्ट्रीय मंचावरून कौतुक करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या नवउद्योग धोरणामुळे अनेक राष्ट्रांनी राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगत गुंतवणूक केली आहे. याबाबत आजच्या मुख्य उदघाटन कार्यक्रमात राष्ट्रीय मंचावरून आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी कौतुक केले. या कार्यक्रमात निवेश बंधू या गुंतवणूक संकेत स्थळाचे सुरुवात प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आली. यामध्ये देशभरातील सर्वच राज्यांच्या अन्न प्रक्रियेविषयीची माहिती या संकेत स्थळावरून मिळणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात काय खास अन्न प्रक्रिया उद्योग आहेत याची सविस्तर माहिती तसेच कुठे गुंतवणूक करण्यास वाव आहे, याबाबतही माहिती या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टॅग्स :Pandurang Phundkarपांडुरंग फुंडकरSadabhau Khotसदाभाउ खोत