शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

काळाच्या ओघात ‘आप’ची कोंडी! काँग्रेसपुढे नमते घेण्याशिवाय पर्याय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 05:55 IST

भाजपची तथाकथित ‘बी’ टीम बनून विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने काँग्रेसच्या मतविभाजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

- सुनील चावकेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पलटविणारा मोदी सरकारचा वटहुकूम राज्यसभेत पराभूत करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विविध राजकीय पक्षप्रमुखांच्या भेटी घेण्यासाठी  ‘देशाटना’ला निघाले आहेत; पण ही मोहीम फत्ते झाली तरी त्यांना दिल्लीत परत आल्यानंतर काँग्रेसपुढे नमते घेण्यावाचून पर्याय नाही.           

भाजपची तथाकथित ‘बी’ टीम बनून विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’नेकाँग्रेसच्या मतविभाजनात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या ११ वर्षांत काँग्रेससह भाजपविरोधी पक्षांना केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सतत हिणवले; पण काळाच्या ओघात ‘आप’ची राजकीय कोंडी झाली आहे.

चोहोबाजूंनी अडकलेल्या ‘आप’चे गर्वाचे घर खाली करण्यासाठी हीच संधी असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. केजरीवाल यांनी कितीही जंगजंग पछाडले तरी राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष काँग्रेसने विरोधात मतदान केल्याशिवाय मोदी सरकारचा वटहुकूम पराभूत होऊ शकणार नाही. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला ‘आप’चा फटका बसणार नाही, याची केजरीवाल यांच्याकडून हमी मिळाल्याशिवाय काँग्रेस वटहुकुमाविरोधात मतदान करणार नाही. 

कुणाला भेटणार?केजरीवाल बुधवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि त्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेणार आहेत.

काँग्रेसमध्ये २ मतप्रवाहआपला पाठिंब्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काँग्रेसच्या दिल्ली व पंजाबमधील नेत्यांनी राज्यसभेत अध्यादेशाच्या मुद्द्यावरून केजरीवाल यांना पाठिंबा देऊ नये, असे आवाहन केले आहे. केजरीवाल यांच्याशी भविष्यात कोणत्याही प्रकारचा समझोता करण्यास विरोध केला आहे. आता याबाबत काँग्रेस श्रेष्ठींना निर्णय घ्यायचा आहे. या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर काँग्रेसने केजरीवाल यांना पाठिंबा दिला नाही, तर विरोधकांच्या ऐक्याला धक्का बसणार आहे.

मनीष सिसोदियांची पोलिसांनी धरली गचांडीदिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मंगळवारी राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात हजर करताना दिल्ली पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांनी केला.

टॅग्स :AAPआपcongressकाँग्रेस