शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर ४ वर्षांनंतर महिलेनं ४ जुळ्या मुलांना दिला जन्म; कुटुंबात आनंदाची लहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 15:19 IST

राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे.

राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथं खासगी रूग्णालयात एका महिलेनं चार जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. चार वर्षांपूर्वी या महिलेचं लग्न झालं होतं. सध्या महिला आणि तिच्या चारही बाळांची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर शालिनी अग्रवाल यांनी सांगितलं की, टोंक जिल्ह्यातील वजीरपुरा येथील रहिवासी किरण कंवर यांना वैद्यकीय समस्यांमुळं लग्नाच्या चार वर्षानंतरही अपत्य झालं नव्हतं. किरण काही महिन्यांपूर्वी आयुष्मान रुग्णालयात उपचारासाठी आली होती. उपचारानंतर ती गरोदर राहिली आणि सोनोग्राफी केली असता ती चार मुलांची आई होणार असल्याचं आढळून आलं. तेव्हापासून डॉक्टरांच्या देखरेखीखाली महिलेवर उपचार सुरू होतं.

२ मुलं आणि २ मुलींना दिला जन्म दरम्यान, शनिवारी रात्री महिलेनं पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर कुटुंबीयांनी तिला आयुष्मान रुग्णालयात दाखल केलं. मग महिला डॉक्टर शालिनी अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया करून महिलेची प्रसूती केली. महिलेनं जन्म दिलेल्या मुलांमध्ये २ मुलं आणि २ मुलींचा समावेश आहे. सध्या तीन नवजात बालकांवर झनाना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एक बालक आणि त्याच्या आईवर आयुष्मान रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुटुंबात आनंदाची लहर लग्न झाल्यानंतर चार वर्षांनी घरात पाळणा हलणार असल्याचं कळताच चार मुलांना जन्म देणाऱ्या आई किरण कंवर यांच्या घरच्यांनी आनंद व्यक्त केला. नवजात बालकांच्या आईचा चेहराच तिची भावना सांगत होता. किरण कंवर यांच्या कुटुंबात तसेच वजीरपुरा गावात आनंदाचे वातावरण आहे. आई आणि मुलांची प्रकृती जाणून घेण्यासाठी गावातील लोक आणि नातेवाईक रुग्णालयात धाव घेत आहेत. त्याचवेळी मुलांचे वडील किसन मोहन सिंग हे देखील खूप आनंदी आहेत. डॉ. शालिनी अग्रवाल यांनी एकाच वेळी चार मुलांची प्रसूती होणं आणि त्यांची प्रकृती ठीक असणं ही दुर्मिळ घटना असल्याचं सांगितलं. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान