शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

उत्तर भारतात हाहाकार! पावसाचे ७२ तासांत ७६ बळी; हिमाचलमध्ये ३९ ठिकाणी भूस्खलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 05:41 IST

उत्तराखंडमध्ये मध्य प्रदेशच्या ४ जणांचा मृत्यू, नवी दिल्लीत सखल भागातील लाेकांना सुरक्षितस्थळी हलवले

नवी दिल्ली - हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये ६ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. हिमाचलमध्ये २४ तासांत ३९ ठिकाणी भूस्खलन झाले. बियास नदीच्या प्रवाहामुळे इमारती वाहून गेल्या, पूल कोसळले. यमुनेने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर आता सखल भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. गेल्या ७२ तासांत देशातील विविध राज्यांमध्ये ७६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये मध्य प्रदेशातील पर्यटकांच्या वाहनांवर दरड कोसळून  मध्य प्रदेशातील इंदूरच्या ४ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत नदीचे पाणी २०६.३२ मीटरवरून वाहत होते. १९७८ मध्ये यमुनेच्या पाण्याने सर्वोच्च २०७.४९ मीटर पातळी गाठली होती.हिमाचलमध्ये आतापर्यंत आपत्तीत २३ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ४ लोक बेपत्ता आहेत. 

मुसळधार पावसाने उत्तर भारतात हाहाकार उडाला असून, प्रचंड नुकसान झाले आहे. हिमाचलच्या सोलन जिल्ह्यातील शामती येथे मंगळवारी दरडी कोसळल्याने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. तर उत्तराखंड येथील उत्तरकाशी-गंगोत्री महामार्गावर संततधारेमुळे दरडी कोसळून त्याखाली वाहने दबली गेली. बचावपथके ती वाहने बाजूला काढताना तसेच मातीच्या ढिगाऱ्याखाली माणसे तर अडकलेली नाहीत ना याची खातरजमा करत आहेत.

टॅग्स :Rainपाऊसlandslidesभूस्खलन