शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये जगातील टॉप- ३ अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल", मोदींचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 20:03 IST

माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत हा जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

narendra modi : माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत हा जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा दावा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केला आहे. "मी देशाला हा विश्वास देऊ शकतो की, तिसऱ्या टर्ममध्ये जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे देखील नाव असेल. पहिल्या तीनमध्ये हिंदुस्थान अभिमानाने उभा असेल. २०२४ मध्ये आमच्या तिसऱ्या टर्ममध्ये देशाचा विकास अधिक वेगाने होईल. तसेच तुमची स्वप्ने तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण होताना दिसतील", असेही मोदींनी नमूद केले. 

दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात बोलताना पंतप्रधान मोदींनी हे विधान केले. तसेच आमच्या पहिल्या टर्मच्या सुरुवातीला भारत जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होता. तुम्ही मला जेव्हा काम दिले तेव्हा आपण दहाव्या क्रमांकावर होतो. आमच्या दुसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आंतरराष्ट्रीय एजन्सी असेही सांगत आहेत की, भारतातील भीषण गरिबी संपण्याच्या मार्गावर आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले. 

भारत लोकशाहीची जननी - मोदी पंतप्रधान मोदींनी आणखी सांगितले की, आज संपूर्ण जग स्वीकारत आहे की, भारत लोकशाहीची जननी आहे. आज आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना अमृत महोत्सव साजरा करत आहोत, त्यामुळे हा 'भारत मंडपम' ही आम्हा भारतीयांनी आपल्या लोकशाहीला दिलेली एक सुंदर भेटच आहे. काही आठवड्यांनंतर इथे G-20 शी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातील. जगातील बड्या देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण जगाला भारताची वाढती पावले आणि भारताची वाढती उंची या 'भारत मंडपम'मधून दिसेल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा