शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

मणिपूरमध्ये शांतता करार दुसऱ्याच दिवशी संपुष्टात; मैतेईबरोबर केलेला करार हमार जमातीच्या संघटनेकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 13:10 IST

...तसेच मैतेई जमातीबरोबर केलेला करार संपुष्टात आणल्याचे हमार जमातीच्या संघटनेने शनिवारी जाहीर केले.

इम्फाळ : मणिपूरमधील जिरिबाम जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मैतेई व हमार जमातींमध्ये करार होऊन २४ तास उलटायच्या आत त्या ठिकाणी हवेत गोळीबार करण्याच्या तसेच सध्या कोणीही राहत नसलेले घर जाळण्याच्या घटना शुक्रवारी रात्री घडल्या. तसेच मैतेई जमातीबरोबर केलेला करार संपुष्टात आणल्याचे हमार जमातीच्या संघटनेने शनिवारी जाहीर केले.

जिरिबाममध्ये हिंसाचार उफाळून आल्यानंतर तेथील काही गावांमध्ये मैतेई जमातीच्या लोकांनी आपली घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी पलायन केले होते. त्यापैकी एका गावातील घर जाळण्यात आले आहे. हे कृत्य करणाऱ्या सशस्त्र हल्लेखोरांनी हवेत गोळीबारही केला. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी त्या गावाकडे धाव घेतली. त्या हल्लेखोरांचा आता कसून शोध सुरू आहे. जिरिबाम येथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी मैतेई व हमार या जमातींमध्ये आसाममधील कचर जिल्ह्यात सीआरपीएफ छावणीत गुरुवारी एक करार झाला होता. त्यासाठी जिल्हा प्रशासन, आसाम रायफल्स, सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.

या करारप्रसंगी थाडौ, पायते आणि मिझो जमातीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या सर्वांची पुढील बैठक येत्या १५ ऑगस्टला आयोजिण्यात आली आहे. मैतेईबरोबर केलेला करार संपुष्टात आणल्याची घोषणा हमार इनपुई या संघटनेने केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले. आमच्याशी संबंधित गटांनी प्रमुख नेत्यांना कल्पना न देता हा करार करण्यात आला होता असे या संघटनेने म्हटले आहे. करारात सहभागी झालेले लोक हे हमार जमातीचे प्रतिनिधी नाहीत असा दावाह करण्यात आला. शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात २००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता व हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले होते. (वृत्तसंस्था

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सचे जवान तैनात ठेवामणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांमध्ये आसाम रायफल्सचेच जवान तैनात ठेवावेत. त्यांच्याऐवजी सीआरपीएफचे जवान या राज्यात तैनात करू नयेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी कुकी-झो जमातीच्या दहा आमदारांनी त्यांना पत्र पाठवून केली आहे. आसाम रायफल्समधील जवानांना मणिपूरची खडानखडा माहिती आहे. त्याऐवजी या परिसराची फारशी माहिती नसलेल्या दलाचे जवान तैनात केले तर मणिपूरमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती कुकी-झो जमातीच्या आमदारांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार