शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये भाजप आमदार, नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न, हिंसक जमावाची सुरक्षा दलाबरोबर चकमक; दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 06:18 IST

इरिंगबाम पोलिस ठाण्यातून शस्त्रास्त्रे पळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

इम्फाळ / कोलकाता : मणिपूरमध्ये ३ मेपासून सुरू असलेला हिंसाचार अद्यापही सुरूच आहे. शुक्रवारी रात्री इम्फाळ शहरामध्ये सुरक्षा दलाचे जवान व हिंसक जमावामध्ये झालेल्या चकमकीत दोन जण जखमी झाले. संतप्त जमावाने भाजपचा एक आमदार व त्या पक्षाच्या नेत्यांची घरे जाळण्याचा प्रयत्न केला. मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यातील क्वाक्ता आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील कांगवाई येथे संपूर्ण रात्रभर गोळीबार सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले. इरिंगबाम पोलिस ठाण्यातून शस्त्रास्त्रे पळविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. हजार लोकांच्या जमावाने या शहरातील राजवाड्याजवळ असलेल्या इमारतींना आग लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून व रबरी गोळ्यांचा मारा करून जमावाला पांगविले. (वृत्तसंस्था)

नेत्याच्या घरात घुसून जमावाने केली तोडफोडइम्फाळमध्ये भाजपचे आमदार बिस्वजित यांच्या घराला आग लावण्याचा व या शहरात भाजप महिला शाखेच्या अध्यक्षा शारदा देवी यांच्या घरात घुसून जमावाने तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांनी त्वरित कारवाई करून या हिंसक जमावाला पांगविले.

आतापर्यंत अनेक मालमत्तांना आगसुमारे दीड महिन्यापासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत अनेक मालमत्तांना आग लावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या घरावर गुरुवारी रात्री हल्ला करण्यात आला होता. त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्नही जमावाने केला होता. 

१० विरोधी पक्षांना करायची आहे पंतप्रधानांशी चर्चा : जयराम रमेशमणिपूरमधील स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी त्या राज्यातील १० विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० जून रोजी एक पत्र पाठवून भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला. अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ते विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील अशी आशा आहे, असेही जयराम रमेश यांनी म्हटले.

काय आहे वाद?मैतेई आणि कुकी समुदायांतील आरक्षणविषयक वादातून मणिपूर पेटले असून, आतापर्यंत १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ११ जिल्ह्यांत संचारबंदी लावण्यात आली आहे. अनुसूचित जातीचा (एसटी) दर्जा देण्याच्या मैतेई समुदायाच्या मागणीविरोधात मणिपूरच्या पहाडी जिल्ह्यांत ‘आदिवासी ऐक्य मार्च’चे आयोजन ३ मे रोजी करण्यात आले होते. तेव्हापासून राज्यात हिंसाचार सुरू आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार