शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Sena Vs. BJP: महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर, इतर पक्षही संपतील; भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 07:19 IST

नड्डा यांनी बिहारमधील भाजपच्या १६ जिल्हा पक्ष कार्यालयांचे पाटणा येथून उद्घाटन केले.

- एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे केला. कोणताही पक्ष भाजपला मात देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

नड्डा यांनी बिहारमधील भाजपच्या १६ जिल्हा पक्ष कार्यालयांचे पाटणा येथून उद्घाटन केले. तेव्हा ते बोलत होते. बिहारमधील राजदसह अन्य प्रादेशिक पक्षांवर हल्ला चढविताना नड्डा म्हणाले की, बिहार ही लोकशाहीची भूमी आहे. येथे घराणेशाहीविरुद्ध केवळ भाजपच लढू शकते. बिहारमध्ये आम्ही राजदशी लढतो आहोत, तो एका कुटुंबाचा पक्ष आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टी हादेखील कौटुंबीक पक्ष आहे. ओडिशात नवीन बाबू यांचा पक्ष हा एका व्यक्तिचा पक्ष आहे. महाराष्ट्रात समाप्तीच्या मार्गावर असलेली शिवसेनादेखील एका कुटुंबाचा पक्ष आहे. अशाच प्रकारे काँग्रेस बहीण - भावाचा पक्ष बनला आहे. 

पाटणा येथे आगमनानंतर झालेल्या भव्य स्वागताचा उल्लेख करून ते म्हणाले की, कालच्या या सोहळ्यावरून भाजपचे सामर्थ्य कसे वाढत आहे, हे लक्षात येते. भाजप सामान्य जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, ज्यांच्याकडे विचार नाहीत ते एकतर संपले किंवा संपतील. आम्हाला वैचारिक पार्श्वभूमी आहे. आमच्याकडे विचार नसते तर आम्ही एवढी मोठी लढाई लढूच शकलो नसतो. विचार नसलेले लोक संपले. जे अद्याप संपले नाहीत, तेदेखील संपतील. राहील तो फक्त भाजप.

आम्ही कार्यालय म्हणतो, ऑफिस नाही. कार्यालय संस्कारांचे केंद्र असते. भाजप आपल्या कार्यकर्त्यांना संस्कार शिकवतो. कार्यालयात बसल्याने एकमेकांसोबत काम करण्याचे संस्कार होतात. भाजपचे कार्यालय कार्यकर्त्यांसाठी शक्तीचे केंद्र आहे. येथून कोट्यवधी कार्यकर्ते तयार होतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपा