शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

धक्कादायक! भूल न देता केली नसबंदी, नाहक त्रासामुळे तडफडत राहिल्या महिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 13:45 IST

बिहारमधील खगरिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : बिहारमधील खगरिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे चक्क नसबंदी केल्यानंतर भूल देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना भूल न दिल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. पीडित पी कुमारी यांनी आरोप केला आहे की, ऑपरेशन दरम्यान नाही तर नंतर भूल देण्यात आली. यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. ही बाब उघडकीस आल्यानंतर सिव्हिल सर्जन डॉ. ए. यांनी चौकशी करून आरोपींवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. 

डॉक्टरांनी दिले कारवाईचे आश्वासन ही धक्कादायक घटना खगरिया जिल्ह्यातील अलौली प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबिरात घडली. डॉक्टरांनीमहिलांना भूल न देता त्यांची नसबंदी केली. यादरम्यान महिला वेदनेने आक्रोश करत होत्या, मात्र त्यांचे कोणीही ऐकले नाही. खरं तर तेथे डॉक्टरही उपस्थित नव्हते, केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रिया केल्याचा आरोप काही महिलांनी केला आहे. 

पीडित महिलांनी केले गंभीर आरोप त्रास होऊ लागल्यानंतर पीडित महिलांनी एकच गोंधळ घातला. भूल देण्याचे इंजेक्शन न देता त्यांच्यावर जबरदस्तीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला आहे. ऑपरेशन दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याचे हात, पाय पकडून तोंड बंद ठेवले आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली.

लक्षणीय बाब म्हणजे एका खासगी संस्थेने आरोग्य विभागाच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केले होते. मात्र बिहारच्या आरोग्य सेवेचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. एका महिलेच्या नसबंदी ऑपरेशनसाठी सरकार या एनजीओला २,१७० रुपये देते. नसबंदीची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने पुरेशी वैद्यकीय व्यवस्था आणि खबरदारी न घेता अशा पद्धतीने ऑपरेशन केले जाते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Biharबिहारdoctorडॉक्टरWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी