शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:50 IST

Karnataka Asembly Election News: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपाची कोंडी करण्यात येत आहे. त्यात आज राहुल गांधी पत्रकार परिषदेमधून मतचोरीबाबत मोठा दावा करण्याची शक्यता आहे. मात्र कर्नाटकमध्ये मतचोरीचा आरोप काँग्रेसवरच उलटण्याची शक्यता दिसत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून मतचोरीच्या मुद्द्यावरून भाजपाची कोंडी करण्यात येत आहे. त्यात आज राहुल गांधी पत्रकार परिषदेमधून मतचोरीबाबत मोठा दावा करण्याची शक्यता आहे. मात्र कर्नाटकमध्ये मतचोरीचा आरोप काँग्रेसवरच उलटण्याची शक्यता दिसत आहे. मंगळवारी कर्नाटक हायकोर्टाने मालूर विधानसभा मतदारसंघातील निकाल रद्द केल्याने काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार नानजेगौडा यांना मोठा धक्का बसला आहे.  

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मालूर विधानसभा मतदारसंघातील निकालावर संशय घेत भाजपाचे उमेदवार एस. मंजुनाथ गौडा यांनी काँग्रेसचे आमदार नानजेगौडा यांच्यावर मतचोरीचा आरोप केला होता. त्यानंतर सुमारे २ वर्षांनी हायकोर्टाने आपला निकाल सुनावताना मतमोजणी प्रक्रियेतील कथित गडबड विचारात घेऊन पुन्हा मतमोजणी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ही मजमोजणी पुढील चार आठवड्यात घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. 

त्यावेळी जिल्हा मतदान  आयुक्त मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडीओ सादर करण्यात अयशस्वी ठरले होते. मालूर विधानसभा मतदारसंघ हा कोलार लोकसभा मतदारसंघात येतो. तसेच हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. येथे आतापर्यंतच्या इतिहासात काँग्रेसने चार वेळा बाजी मारली आहे. तर भाजपाने २ वेळा आणि जेडीएसने  एकदा येथे विजय मिळवला होता. 

दरम्यान,  मे २०२३ मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत मालूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार एस. मंजुनाथ गौडा यांचा नानजेगौडा यांनी केवळ २४८ मतांनी पराभव केला होता. येथे अपक्ष उमेदवार विजय कुमार यांनी घेतलेली मते निकालांमध्ये निर्णायक ठरली होती. दरम्यान, निकाल  लागल्यानंतर एक आठवड्याच्या आत मंजुनाथ यांनी कोर्टात धाव घेत निकालाला आव्हान दिले होते.  

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसHigh Courtउच्च न्यायालय