शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात 'आप'चा झाडू चालला; झेडपीत भाजपची सफाई, केवळ २२ जागांवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 06:18 IST

१०२ पैकी केवळ २२ जागांवर कमळ फुलले

हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हरयाणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव हा धक्कादायक ठरला आहे, कारण त्यांना १०२ जागांपैकी केवळ २२ जागा जिंकता आल्या आहेत. २२ जिल्ह्यांत जिल्हा परिषदेच्या ४११ जागा होत्या. भाजपने केवळ १०२ जागा आपल्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला होता. या पक्षाने मात्र अपक्ष म्हणून १५१ जागा जिंकल्याचा दावा केला आहे. 

उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या सहकारी जेजेपीने रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आणि भाजपला शहरी भागावर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडले. मात्र, रविवारी निकाल हाती आल्यानंतर भाजपची मोठी कोंडी झाली. जेजेपीसाठी धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा प्रतिस्पर्धी आयएनएलडीचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी ९८ जागांवर निवडणूक लढविली आणि १३ जागा जिंकल्या. दोन्ही पक्ष जाट मतांवर वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. 

अपक्षांची सुरू झाली लगबग n सर्वात आश्चर्यकारक घडामोडी म्हणजे, आपचा उदय. ११४ वॉर्डांमधून १४ जागा त्यांनी जिंकल्या आहेत. हरयाणात आप बूस्टर डोसच्या शोधात असताना हे निकाल आले आहेत. n काँग्रेसने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मोठ्या संख्येने त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून विजयी झाल्याचा दावा त्यांनी केला. n भाजपने दोन महिन्यांपूर्वी ४६ नगरपालिकांत बहुमत मिळविले होते. पुढील महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची प्रमुख पदे काबीज करण्यासाठी अपक्षांची लगबग सुरू झाली आहे.

टॅग्स :AAPआपHaryanaहरयाणाElectionनिवडणूकBJPभाजपा