शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चहाचा आग्रह पण असा? पती घरी आला नाही; पत्नीचा व्हिडीओ कॉल अन् टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 11:30 IST

पती चहा पिण्यासाठी घरी न आल्याने पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पती चहा पिण्यासाठी घरी न आल्याने पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमधील वडोदरा येथील या अनोख्या घटनेने अनेकांचे लक्ष वेधले. येथे एका महिलेने पती चहा प्यायला घरी न आल्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पती घरी न आल्याने नाराज झालेल्या महिलेने त्याला व्हिडीओ कॉल करून गळफास घेण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वडोदरा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. वृत्तसंस्था 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. २८ वर्षीय महिलेने तिच्या पतीला व्हिडीओ कॉल केला आणि कथितपणे गळफास घेण्याचा प्रयत्न केला. 

व्हिडीओ कॉल अन् टोकाचे पाऊल महिलेचा पती शहरातील एका रुग्णालयात डॉक्टर आहे. तो चहा पिण्यासाठी घरी परतला नाही, असा आरोप आहे. यामुळे त्याची पत्नी नाराज होती अन् याच रागातूनच तिने टोकाचे पाऊल उचलले. वडोदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी या जोडप्याचे लग्न झाले होते. पतीच्या जबाबानुसार आम्ही गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिलेची स्थिती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, मागील वर्षी डिसेंबरमध्ये उत्तर प्रदेशात देखील अशीच एक घटना घडली होती. पण, इथे काहीसे वेगळे झाले होते. यूपीतील बागपत जिल्ह्यात एका महिलेने पतीने चहा मागितली म्हणून धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर पोलिसांच्या अटकेच्या भीतीने महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. महिलेच्या पतीने चहाचा कप मागितल्याने पत्नीला राग आला आणि तिने कात्री उचलून पतीच्या डोळ्यात वार केले होते. 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी