शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत केंद्राने महाराष्ट्राला दिले २२३ प्रकल्प, विलंबाने वाढला खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 07:28 IST

लाखो कोटींचे प्रकल्प प्रस्ताव येऊनही वेळेत पूर्ण करू शकले नाही राज्य सरकार

हरीश गुप्तापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत पाच वर्षांत महाराष्ट्राला केंद्राकडून सर्वाधिक प्रकल्प दिले. यांपैकी प्रत्येक प्रकल्प १५० कोटी आणि त्याहून अधिक २ लाख कोटींचा आहे; परंतु ते वेळेत पूर्ण करण्याच्या बाबतीत राज्याची कामगिरी निराशाजनक आहे, त्यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढल्याचे दिसत आहे.

पैकी बऱ्याच प्रकल्पांना ९ ते २२८ महिन्यांचा वेळ गेला आणि विलंबामुळे खर्चात २५००० कोटींची वाढ झाली. पंतप्रधान यांच्या प्रगतीचे वैयक्तिकरीत्या निरीक्षण करत आहेत. हे प्रकल्प २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. या २२३ प्रकल्पांसाठी निधीच्या बाबतीतही महाराष्ट्राचा वाटा सिंहाचा होता. १५७९ प्रकल्पांची एकूण किंमत २१.९५ लाख कोटी निश्चित करण्यात आली आणि महाराष्ट्राला २ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या मते, केंद्र महाराष्ट्राप्रती अधिक उदार होते; १२८ होती. ती २०२२ मध्ये २२३ वर पोहोचली. त्याबाबतीत पंतप्रधान मोदी यांचे गृहराज्यही तितके नशीबवान नव्हते. या राज्यात २०१८ मध्ये ४८ प्रकल्प होते. ते २०२२ मध्ये ५७ झाले.

प्रकल्पांना का झाला विलंब ?मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रात खर्च आणि वेळेत वाढ होण्याचे एक कारण म्हणजे केंद्र सरकार आणि तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार यांच्यात तीन वर्षांपासून सतत झालेला संघर्ष हे आहे. यामुळे अनेक निर्णय घेण्यात खूप वेळही गेला.महाराष्ट्रात सध्या शिंदे फडणवीस यांचे सरकार २ आल्याने या प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. यात पंतप्रधानांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही समावेश आहे. हा प्रकल्प आता जलदगतीने मार्गी लागू शकतो. सरकारने त्या दिशेने पाठपुरावाही सुरू केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्र