शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत तब्बल ९८ विद्यार्थ्यांनी देशभरात मृत्यूला केले जवळ; केंद्रीय शिक्षण संस्थांबाबत सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 06:08 IST

करिअरची चिंता

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत केंद्रीय विद्यापीठे, ‘आयआयटी’, ‘एनआयटी’, ‘आयआयआयटी’, ‘आयआयएम’ , ‘आयआयएसईआर’मध्ये ९८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती सरकारने संसदेत दिली. २०१८ मध्ये या संस्थांतील २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. २०१९ मध्ये हा आकडा १९ होता. २०२० व २०२१ मध्ये तो खाली आला. २०२२ मध्ये ही संख्या पुन्हा वाढून २४ झाली, तर २०२३ मध्ये आतापर्यंत २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी संसदेत दिली.

‘आयआयटी’त यंदा सात घटना

२०१८-२०१९ मध्ये ८ घटना घडल्या. २०२०-२०२१ मध्ये त्या ३ व ४ पर्यंत खाली आल्या. २०२२ मध्ये संख्या पुन्हा वाढून ९ झाली २०२३ मध्ये आतापर्यंत ७ घटना समोर आल्या.२०१८ साली केंद्रीय विद्यापीठांत आत्महत्येच्या ८ घटना २०१९- २०२० मध्ये २ घटना घडल्या. २०२१ मध्ये एकाही घटनेची नोंद नाही. 

२०२२ मध्ये चार घटना घडल्या होत्या, तर यावर्षी आतापर्यंत नऊ घटना घडल्या आहेत.

आत्महत्येची कारणे काय?

राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या अहवालानुसार आत्महत्येमागे व्यावसायिक/ करिअरच्या समस्या, एकटेपणाची भावना, गैरवर्तन, हिंसाचार, कौटुंबिक समस्या व मानसिक विकार यासारखी विविध कारणे आहेत. 

‘या’ विद्यार्थ्यांनी सोडले ‘आयआयटी’ 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि इतर अल्पसंख्याक गटातील एकूण २५,५९३ आरक्षित वर्गातील विद्यार्थी पाच वर्षांत केंद्रीय विद्यापीठे आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधून बाहेर पडल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी राज्यसभेत दिली. 

टॅग्स :Studentविद्यार्थी