शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात के. कविता यांचा सहभाग, ईडीने सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 03:58 IST

दिल्लीतील विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हे पुरवणी आरोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले. 

नवी दिल्ली : दिल्लीच्या मद्य धोरण प्रकरणात ११०० कोटी रुपयांचे लाँड्रिंग झाले. त्यातील २९२.८ कोटी रुपयांच्या प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांचा हात असल्याचा दावा ईडीने यासंदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या त्या कन्या आहेत.

दिल्लीतील विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हे पुरवणी आरोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले. के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या प्रकरणातील तीन आरोपी प्रिन्स, दामोदर, अरविंद सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. 

या आरोपपत्रात म्हटले आहे की, आपच्या वरिष्ठ नेत्यांसाठी काम करत असलेल्या विजय नायर या व्यक्तीच्या माध्यमातून त्या पक्षाला १०० कोटी रुपयांची लाच देण्यात आली. या गुन्ह्यात के. कविता यांचा सहभाग आहे. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या गुन्ह्यातही त्या सामील होत्या. 

८ आयफोन केले फॉरमॅटबीआरएसच्या नेत्या के. कविता यांचे ८ आयफोन ईडीने ताब्यात घेतले होते, त्यात आयफोन १३ मिनी प्रकारातील २, आयफोन १३ प्रकारातील ४, आयफोन १४ प्रो प्रकारातील २ फोन होते. हे सगळे फोन फॉरमॅट करण्यात आले होते.  या फोनमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणातील पुरावे आहेत. के. कविता यांना दिल्लीमधील  पंचतारांकित हॉटेलात १० लाख रुपये भाडे असलेल्या रूममध्ये वास्तव्य केले होते, असा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीCourtन्यायालय