शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोटगी न दिल्याने पत्नीनं पाठवलं तुरूंगात; तब्बल ५५ हजारांची नाणी घेऊन पती न्यायालयात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 17:33 IST

जयपूर येथील कौटुंबिक न्यायालयात एक अनोखी घटना घडली.

Unique Divorce case : जयपूर येथील कौटुंबिक न्यायालयात एक अनोखी घटना घडली. इथे न्यायालयाच्या आदेशानंतरही पतीने पत्नीला पोटगी न दिल्याने पत्नीने न्यायालयात तक्रार केली आणि कायद्यानुसार पतीला अटक करण्यात आली. लक्षणीय बाब म्हणजे कालांतराने कोर्टाची तारीख आली अन् पती पत्नीसाठी तब्बल ५५ हजारांची नाणी घेऊन कोर्टात पोहोचला. पण तरीदेखील पत्नीला हे पैसे घेता आले नाहीत. मग न्यायालयाने पुढची तारीख दिली. 

दरम्यान, जयपूरच्या हरमाडा भागात राहणाऱ्या दशरथ आणि सीमा यांचा विवाह सुमारे बारा वर्षांपूर्वी झाला होता. मागील पाच वर्षांपासून दोघांमध्ये वेगळे राहण्याचा खटला न्यायालयात सुरू आहे. नियमानुसार न्यायाधीशांनी पोटगी निश्चित केली होती, मात्र पती दशरथने दरमहा द्यावयाची पोटगी दिलीच नाही. थकबाकीपोटी ही रक्कम सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली. तरीदेखील दशरथने पैसे न दिल्याने प्रसंगी त्याला अटक करण्यात आली. जामीन मिळाल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला.

तब्बल ५५ हजारांची नाणी घेऊन पती न्यायालयात सोमवारी म्हणजेच १९ जून रोजी कोर्टाची तारीख होती. तेव्हा दशरथ तब्बल ५५,००० रूपयांची नाणी घेऊन कोर्टात पोहोचला. शिवाय त्याने पत्नीने आपला छळ केला असल्याचा आरोपही केला. हे पैसे एक आणि दोन रुपयांच्या नाण्यांमध्ये होते. त्यामुळे या नाण्यांनी सात गोण्या भरल्या होत्या आणि त्यांचे एकूण वजन २८० किलो एवढे होते. हे पैसे आपण घेऊ शकत नाही, असे दशरथची पत्नी सीमाने न्यायालयात सांगितले. पण हे भारतीय चलन असल्याने नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने २६ जूनची तारीख दिली आहे. खरं तर २६ जून रोजी न्यायालयाने दशरथला एक-एक हजार अशी रक्कम आणायला सांगितली आहे. त्यानंतरच पैसे स्वीकारले जातील, असा आदेश दिला आहे. कारण अद्याप एक लाखाहून अधिक रुपयांची थकबाकी आहे.

टॅग्स :jaipur-pcजयपूरCourtन्यायालयDivorceघटस्फोट