शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

२०१४ मध्ये म्हणाले, मी पुन्हा येणार अन् आलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:36 IST

२०१४ मध्ये पदावरून दूर होताना ओमर अब्दुला यांनी मी पुन्हा येईन असे म्हटले होते. तो शब्द खरा करत ओमर अब्दुला पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला व त्यांच्या पाच मंत्र्यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २०१४ मध्ये पदावरून दूर होताना ओमर अब्दुला यांनी मी पुन्हा येईन असे म्हटले होते. तो शब्द खरा करत ओमर अब्दुला पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

२०१९मध्ये राज्यघटनेचे ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात पहिल्यांदाच लोकनियुक्त सरकार सत्तेवर आले आहे. काँग्रेसने या सरकारला पाठिंबा दिला असला तरी तो पक्ष मंत्रिमंडळात सहभागी झालेला नाही. 

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी, मंत्री सकीना मसूद (इटू), जावेद दार, जावेद राणा आणि सतीश शर्मा या सहा जणांनी आपल्या पदाची शपथ घेतली.  ओमर अब्दुल्ला हे काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी ओमर यांचे आजोबा शेख अब्दुल्ला, वडील फारूक अब्दुल्ला हेही याआधी विराजमान झाले होते. तोच मान पुन्हा ओमर अब्दुल्ला यांना मिळाला आहे.

बाहेरून पाठिंबा : काँग्रेस- जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले.- मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिला असला तरी पक्षाने राज्य मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.  आहे. पूर्ण सहकार्य : पंतप्रधान ओमर अब्दुल्ला यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार अब्दुल्ला यांना संपूर्ण सहकार्य करेल.  

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर