शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारताने कंडोमची मोठी ऑर्डर दिलेली; १९७१ मध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:26 IST

१९७१ मध्ये भारताचे पाकिस्तान विरोधात मोठं युद्ध झालं होतं.

भारतीय सेनेने १९७१ मध्ये पाकिस्तानविरोधात झालेल्या लढाईत मोठी कामगिरी केली होती. जवानांच्या कामगिरीच्या तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील. भारतीय सैन्याने या लढाईत अनेक युक्त्या वापरल्या होत्या. या युद्धादरम्यान भारतीय नौदलाने शेकडो कंडोम ऑर्डर केले होते. 

डिसेंबर १९७१ मध्ये भारत बांगलादेशच्या मुक्तीसाठी पाकिस्तानशी लढत होता. युद्धादरम्यान, भारतीय नौदलाने माइन वापरून पाकिस्तानी जहाजांवर हल्ला करण्यासाठी आणि बांगलादेश यशस्वीपणे मुक्त करण्यासाठी शेकडो कंडोम ऑर्डर केले. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आतिशींविरोधात काँग्रेस फायरब्रँड महिला उमेदवार अलका लांबा यांना उतरवणार

या युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याने भारतीय एअरबसवर हल्ला केला. यामुळे भारतीय नौदलाने पाकिस्तानवर हल्ला वाढवला. यावेळी चितगाव बंदरावर भारतीय सैन्याने पाकिस्तानी जहाजांना उडवून त्यांना लक्ष्य करण्याची योजना आखली होती. मात्र, जहाजाच्या खाली 'लिंपेट माईन' नावाचा भूसुरुंग ठेवला जाणार होता, मात्र त्याचा स्फोट अवघ्या ३० मिनिटांत होणार होता.

यामुळे या स्फोटकाला पाण्यापासून वाचवण्यासाठी भारतीय नौदलाने १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान शेकडो कंडोम ऑर्डर केले. एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, कंडोम लिंपेट माइनवर ठेवण्यात आले होते, जेणेकरून माइन पाण्यात सुरक्षित राहील आणि वेळेत स्फोट होईल. 

भारतीय नौदलाचे चितगाव बंदर ऑपरेशन हे १९७१ च्या युद्धादरम्यानच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या पाकिस्तानच्या शिपिंग आणि पुरवठा मार्गांना खराब करण्याच्या भारताच्या धोरणाचा एक भाग होता.

१९७१ चे भारत-पाक युद्ध हे दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेले तिसरे युद्ध होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत