शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुधारणा- मनोज नरवणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 19:54 IST

लष्करातील माझ्या अनुभवामुळे, विशेषत: शेवटच्या दोन कामकाजांमुळे प्रशिक्षणाबरोबरच कार्यबद्दलही मला चांगली कल्पना मिळालेली आहे.

नवी दिल्ली: जनरल बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. लष्करातील माझ्या अनुभवामुळे, विशेषत: शेवटच्या दोन कामकाजांमुळे प्रशिक्षणाबरोबरच कार्यबद्दलही मला चांगली कल्पना मिळालेली आहे. त्यामुळे कार्यवाहीमधील तत्परतेचे मापदंड राखणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले आहेत. 

दहशतवाद ही जगभरातील समस्या आहे आणि बर्‍याच काळापासून भारतही दहशतवादाचा सामना करत आहे. त्यामुळेच संपूर्ण जग आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या अनेक देशांना आपल्याला नेमका कोणता धोका आहे, याची जाणीव होत आहे.आमच्या शेजारील देश दहशतवादाचा वापर करून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेजारील राष्ट्रांकडून सुरू असलेलं छुपं युद्ध फार काळ चालणार नाही. अशी स्थिती जास्त काळ टिकू शकत नाही. कारण लोकांना सारखं सारखं मूर्ख बनवता येत नाही.अनुच्छेद 370च्या रद्दबातलानंतरच्या परिस्थितीत निश्चितच सुधारणा झाली आहे.हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे, जम्मू-काश्मीरच्या लोकसंख्येच्या दृष्टीने हे चांगले आहे. प्रदेशात शांतता व समृद्धी आणण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. युद्धबंदीचे उल्लंघन होत आहे, आम्हाला हे माहीत आहे की पलीकडे जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विविध लाँचपॅडमध्ये दुसरीकडे दहशतवादी आहेत, पण आम्ही हा धोका पत्करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.वास्तविक नियंत्रण रेषा कोठे आहे यावर मतभेदांमुळे उल्लंघन होत आहे. नियंत्रण रेषेवर शांतता कशी टिकवायची यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून दहशतवाद्यांच्या जमिनीवरच्या हालचाली कमी झालेल्या आहेत.