शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

सुधारित इंद्राणी साइड स्टोरी

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

थंड डोक्याने खून करणारी इंद्राणी मुखर्जी सोशल मीडियावर सक्रिय

थंड डोक्याने खून करणारी इंद्राणी मुखर्जी सोशल मीडियावर सक्रिय
--------
डिप्पी वांकाणी
मुंबई : इंद्राणी मुखर्जी यांच्या जगण्याबद्दल सोशल मीडियात डोकावले तर ही बाई अतिशय थंड डोक्याने खून करणारी असू शकते यावर विश्वास बसणार नाही. उलट तिला पार्ट्या झोडणे व तंदुरुस्त राहून जगभर प्रवास करायला आवडतो, असे दिसेल. इंद्राणीचा पती पीटरने अगदी मोजक्या वेळाच टिष्ट्वटरचा वापर केला व तो सोशल मीडियावर सक्रियदेखील नाही. परंतु इंद्राणीला सणासुदीच्या दिवसांतील, प्रवासातील व विशेषत: आपल्या मुलीसोबतची छायाचित्रे पोस्ट करायला आवडते. इंद्राणीची तिच्या मुलीसोबतची छायाचित्रे पाहून तिच्या मित्रांनी ती दिवसेंदिवस तरूण होत असून आता ती तिच्या मुलीची बहीणच वाटते, अशी प्रतिक्रिया पाठविली. यावर्षी जुलैपर्यंत इंद्राणी सोशल मीडियावर एवढी सक्रिय होती की ते पाहून तिने आपल्या बहिणीच्या खुनाचा प्रत्यक्ष आदेश दिला होता, असे कोणालाही वाटणार नाही. इंद्राणी मुखर्जी हिच्यावर शीनाच्या खुनाचा आरोप होता व तिला अटकही झाली होती. या शीनाचे लिंकएडइनवरील एकमेव अकाऊंट वगळता सोशल मिडियावर अकाऊंट नव्हते व लिंकएडइनवरील खाते २०११ पासून अपडेटही केलेले नव्हते.
इंद्राणी मुखर्जीने २०१२ मध्ये शीनाच्या खुनाचा आदेश तिच्या ड्रायव्हरला दिल्याचा आरोप आहे. तेव्हापासून इंद्राणी केवळ जगभरच फिरत नसून तिच्या फेसबुक प्रोफाईलवर नियमितपणे छायाचित्रेही पोस्ट करीत आहे. तिने दिवाळीत सजवलेल्या घराची छायाचित्रे जशी सोशल मिडियावर पोस्ट केली त्याच उत्साहात तिने नूतन वर्षात लुटलेल्या सुट्यांच्या आनंदाची छायाचित्रेही पोस्ट केली. ३१ डिसेंबर २०१४ रोजी इंद्राणीने तिच्या फेसबुक फ्रेंडस्ला खालील शब्दांत शुभेच्छा दिल्या होत्या :
हाय ऑल, वर्षअखेर किती आनंददायी होते आणि २०१५ वर्ष किती अद्भूत आहे. सरलेले वर्ष किती धावपळीचे होते तरीही ते प्रवास, मुक्काम, कुटंबीय व मित्रांसोबत वेळ घालविणे, आरोग्यदायी खाणे असा संमिश्र आनंद लुटता येईल असे होते. वजन कमी करणे अशक्य ठरले तरीही हे संपूर्ण वर्ष तसे छान गेले. तुमचेही २०१४ हे वर्ष चांगले गेले असेल अशी मला आशा आहे. नवीन वर्ष सुरक्षित, आरोग्यदायी व आनंदी असेल व गेल्यावर्षी आपण जेवढे एकमेकांना भेटलो त्यापेक्षा २०१५ मध्ये जास्तवेळा भेटू अशी मी शुभेच्छा व्यक्त करते. आम्ही ज्या आनंदात दिवस घालविले त्याच्या घेतलेल्या छायाचित्रांचा कोलाज पीटरने केला असून तो तुम्हाला दाखवावा हा विचार केला.
प्रेमपुर्वक
विधी, पीटर आणि मी
---------
इंद्राणीने शेवटचे छायाचित्र पोस्ट केले ते १६ जुलै रोजी. तिच्या या छायाचित्राला तिच्या मित्रांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या सगळ्यांना तिने उत्तरे पाठविली. स्वत:च्या तरूण दिसण्याचे श्रेय तिने कच्चे अन्न खाण्याला दिले आहे. इंद्राणीने गोवा, स्पेन आणि इतर ठिकाणी सुट्यांचा आनंद लुटला व तेथील छायाचित्रे तिने पोस्ट केली.
बॉक्स
------
मृत शीना बोरा हिच्या ऑनलाईन पाऊलखुणा आहेत त्या लिंकएडइन या व्यावसायिक नेटवर्किंग वेबसाईटवर. शीना जुलै २०११ पासून मुंबईत रिलायन्स एडीएजीत असिस्टंट मॅनेजर (ह्यूमन रिसोर्सेस) म्हणून काम करीत असल्याचे तिचे प्रोफाईल सांगते. तेव्हापासून प्रोफाईलवर कोणतीही घटना घडलेली नाही. प्रोफाईलवरून असे दिसते की २००९ ते २०११ या कालावधीत शीना रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या ट्रेनिंग अँड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंटमध्ये शिकाऊ उमेदवार होती. बोराने सेंट झेवियर कॉलेजमधून अर्थशास्त्रात बी. ए. केले.
------------