शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सर्व कृषीमालाची हमीभावाने खरेदी अशक्य; अहवाल सार्वजनिक करा, समितीचे सदस्य अनिल घनवट यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 06:49 IST

शेतकरी संघटनेचे नेते घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की सरकारचे संपूर्ण महसुली उत्पन्न हमी भावावर खर्च केले जाऊ शकत नाही. हमी भावाने खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसा कुठून येणार? खरेदी केल्यानंतरही त्याची साठवणूक आणि वितरण कसे हाेणार? असे अनेक प्रश्न आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांबाबत सर्वाेच्च न्यायालयाने एक समिती नेमली हाेती. समितीने न्यायालयात अहवाल सादर केला हाेता. ताे लवकरात लवकर सार्वजनिक करावा, अशी मागणी समितीचे सदस्य अनिल घनवट यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहून केली आहे. सर्व प्रकारच्या कृषीमालाची हमी भावाने खरेदी करणे आणि यासाठी कायदा करण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करणे अशक्य असून लागू करण्यायाेग्य नाही, असे मत घनवट यांनी मांडले आहे. शेतकरी संघटनेचे नेते घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की सरकारचे संपूर्ण महसुली उत्पन्न हमी भावावर खर्च केले जाऊ शकत नाही. हमी भावाने खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसा कुठून येणार? खरेदी केल्यानंतरही त्याची साठवणूक आणि वितरण कसे हाेणार? असे अनेक प्रश्न आहेत. कृषीक्षेत्राला मुक्त करणे आणि शेतकऱ्यांना स्वत:च्या मालाचे विपणन करण्याचे स्वातंत्र्य दिल्याने या समस्यांवर ताेडगा निघू शकताे, असे घनवट म्हणाले.त्यांनी सांगितले, की केंद्र सरकारने तीनही कृषी कायद्यांना मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतरही समितीच्या अहवालाला अर्थ राहत नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये अनेक गैरसमजुती आहेत. शेतकऱ्यांची काही नेत्यांनी दिशाभूल केली आहे, असे माझे मत आहे. त्यामुळे अहवाल सार्वजनिक करून जनतेसमाेर त्यातील मुद्दे आले पाहिजेत, असे घनवट म्हणाले. घनवट म्हणाले की, नवे कायदे अस्तित्वात राहणार नाहीत. मात्र, त्यातून कृषीक्षेत्रातील सुधारणांची प्रबळ इच्छा टिकून राहायला हवी. अनिल घनवट यांनी नवे कृषी कायदे बनविण्यासाठी श्वेतप्रत्रिका काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचीही सूचना केली आहे.

देशभर करणार दाैरा-  घनवट यांनी सांगितले की, मी देशभरात दाैरा करणार आहे. शेतकऱ्यांना कृषीक्षेत्रातील सुधारणांच्या फायद्यांबाबत माहिती देणार आहे. - अनेक शेतकरी आवश्यक कृषी सुधारणांची मागणी करत आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये अशा सुमारे एक लाख शेतकऱ्यांना एकत्र करणार असल्याचेही घनवट म्हणाले.

अनेक सूचनाशेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी या अहवालात अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी या सूचनांचा उपयोग होऊ शकतो.

- अनिल घनवट म्हणाले की, तीन कृषी कायद्यांना विराेध करणाऱ्या शेतकऱ्यांनी सैद्धांतिक स्वरूपात कायदे स्वीकारले हाेते. मात्र, ते पूर्णपणे मान्य नव्हते केले. - याचे प्रमुख कारण म्हणजे, सरकारचे चर्चेचे धाेरण नव्हते. त्यामुळे एक सक्षम नीती प्रक्रिया विकसित करावी, अशी मागणीही घनवट यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालय