शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

महत्वाचे वृत्त- ठळकपणे वापरावे

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

तिस्ता सेटलवाड यांच्या कार्यालयासह तीन ठिकाणी छापे

तिस्ता सेटलवाड यांच्या कार्यालयासह तीन ठिकाणी छापे
------------------
सीबीआयची कारवाई : विदेशी चलन कायद्याचा भंग प्रकरण
मुंबई : सबरंग कम्युनिकेशन्स आणि त्याच्या संचालिका तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांच्या कार्यालयासह मुंबईतील तीन ठिकाणी केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) १६ जणांच्या तुकडीने मंगळवारी छापे घातले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय आणि नोंदणी न करता विदेशातून देणग्या स्वीकारल्याबद्दल सीबीआयने ८ जुलै रोजी सबरंग कम्युनिकेशन्सविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाचा कट करणे आणि विदेशी साह्य नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आरोपांना पुष्टी देणारी काही महत्वाची कागदपत्रे या छाप्यात हाती लागल्याचे सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
सीबीआयचे प्रवक्ते कांचन प्रसाद म्हणाले की,'सीबीआयने सबरंग कम्युनिकेशन्स अँड पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड (पत्ता : निरंत, जुहु तारा रोड, सांताक्रूझ) आणि त्याचे संचालक जावेद आनंद, तिस्ता सेटलवाड, पेशीमम गुलाम महमंद आणि अज्ञात व्यक्तिंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा भारतीय दंड विधानाचे कलम १२० (बी), त्यातील विदेशी चलन नियमन कायदा, २०१० चे कलम ३५, ३७, त्यात कलम ३,११ आणि १९ ते विदेशी चलन नियमन कायदा, १९७६ चे कलम २३,२५ मधील कलम ४,६ आणि १३ अन्वये दाखल झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी न घेता विदेशी साह्य बेकायदेशीरपणे स्वीकारून गुन्हेगारी स्वरुपाचा कट केल्याचा हा गुन्हा दाखल झाला आहे.'
हा गुन्हा सिद्ध झाल्यास ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. तिस्ता सेटलवाड यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले की, चौकशीसाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू असे आम्ही न्यायालयाला आधीच सांगितलेलेअसतानाही टाकण्यात आलेल्या छाप्यांमुळे आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही पूर्ण सहकार्य करू असे पत्र सीबीआयला लिहिले होते आणि आमच्याविरुद्ध जे काही तथाकथित गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या चौकशीत आम्ही पूर्ण सहकार्य करू, असेही त्यात म्हटले होते. म्हणूनच ही छाप्यांची सगळी कारवाई आमच्या आकलनशक्तीबाहेरची आहे, असे सेटलवाड म्हणाल्या. हा सगळा प्रकार राजकीय सूड असून त्यातून आमचा अपमान करण्याचा व आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही तिस्ता सेटलवाड यांनी केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयचे अधिकारी या संचालकांना त्यांनी विदेशी निधीतून मिळालेला पैसा कसा खर्च केला याबद्दलही प्रश्न विचारणार आहेत. (प्रतिनिधी)
चौकट १
-------
असे आहे प्रकरण
पब्लिकेशनचे २००६ ते २०१५ या कालावधीतील व्यवहार आम्ही तपासले असता एससीपीपीएलने २,९०,००० डॉलर आणि १,३०,९७,१५३ रुपये आमच्या परवानगीशिवाय स्वीकारल्याचे आढळले आहे, असे गृह मंत्रालयाने गेल्या महिन्यात सीबीआयला कळविले होते. ते केवळ प्रकाशन असून त्यांना विदेशी साह्य स्वीकारण्याचे अधिकार नाहीत आणि जर त्यांना ते स्वीकारायचे होते तर त्यांनी आधी परवानगी घ्यायला हवी होती. दस्तावेजांचा अभ्यास करून त्यानंतर सीबीआयने ८ जुलै रोजी गुन्हा दाखल केला.
चौकट २
----------
विदेशी चलन नियमन कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन झाल्यास कठोर शिक्षा होऊ शकते ती अशी-
अ) पाच वर्षांचा तुरुंगवास आणि किंवा दंड.
ब) जेवढे विदेशी साह्य खर्च केले त्याच्या किमतीच्या पाचपटपर्यंत दंड.
क) गुन्हा सिद्ध झालेल्या व्यक्तिला विदेशी साह्य स्वीकारण्यास ३ वर्षांपर्यंतची मनाई.