शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

LoC वर भारत आणि पाकिस्तानमध्ये 75 मिनिटे चालली महत्वाची बैठक; कोणत्या विषयावर चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:58 IST

अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये फ्लॅग मिटींग झाली नव्हती.

India-Pakistan Talk :भारत आणि पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी(21 फेब्रुवारी) दोन्ही देशांमध्ये महत्वाची बैठक झाली. यादरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) सीमेपलीकडून गोळीबार आणि आयईडी हल्ल्यांच्या अनेक घटनांनंतर तणाव कमी करण्यासाठी चर्चा करण्यात आली. सुमारे 75 मिनिटे चाललेल्या बैठकीत दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखण्यावर भर दिला. 

गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये फ्लॅग मिटींग झालेली नाही. शेवटची ध्वज बैठक 2021 मध्ये झाली होती. त्यामुळेच ही बैठक खूप महत्वाची होती. बैठकीत 2021 पासून नियंत्रण रेषेवर सुरू असलेला युद्धविराम कायम ठेवणे, नियंत्रण रेषेला तणावमुक्त करणे यासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा करून एकमत झाले. भारताकडून पूंछ ब्रिगेडचे कमांडर आणि पाकिस्तानी लष्कराच्या दोन पाकिस्तानी ब्रिगेडचे कमांडर बैठकीत सहभागी झाले होते.

एलओसीवर घडणाऱ्या घटनांमुळे चिंतानियंत्रण रेषेवर तणाव वाढवण्यासाठी पाकिस्तान सातत्याने कट रचत आहे. काही दिवसांपासून एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. बुधवारी एलओसी ओलांडून राजौरीमध्ये भारतीय हद्दीत गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. 11 फेब्रुवारी रोजी जम्मू जिल्ह्यातील नियंत्रण रेषेच्या अखनूर सेक्टरमध्ये इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (IED) स्फोटात एका कॅप्टनसह दोन जवान शहीद झाले. 

सैन्याची नियंत्रण रेषेवर तीक्ष्ण नजरभारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा नियंत्रण रेषेवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. पाकिस्तान सतत भारताविरुद्ध कट रचतो, पण भारतदेखील पाकिस्तानला प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर देतो. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर