शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गुड न्यूज! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाची माहिती; लहान मुलांच्याही लसीकरणाला होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 19:39 IST

जायडस कॅडिला लस आल्यानंतर १२ ते १८ वयोगटातील लहान मुलांचं लसीकरण करण्यास सुरुवात होईल.

ठळक मुद्देसध्या देशभरात १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा मानस आहे.लसीकरण मोहिमेत तेव्हाच वेग येऊ शकतो जेव्हा मोठ्या संख्यने लस देशात उपलब्ध असेल.

नवी दिल्ली -  कोरोना लसीच्या अभावादरम्यान देशी लस कंपनी जायडस कॅडिलाबाबत मोठी बातमी हाती आली आहे. या लसीची चाचणी जवळपास पूर्ण झाली आहे. पुढील काही महिन्यात ही लस लहान मुलांना देण्यास सुरुवात होऊ शकते. कोविड टास्क फोर्सचे डॉ. एन. के अरोडा यांनी याबाबत माहिती दिली आहे. जुलै किंवा ऑगस्ट अखेरपर्यंत जायडस कॅडिला लसीची चाचणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

एन.के अरोडा म्हणाले की, जायडस कॅडिला लस आल्यानंतर १२ ते १८ वयोगटातील लहान मुलांचं लसीकरण करण्यास सुरुवात होईल. सध्या देशभरात १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा मानस आहे. परंतु लसीकरण मोहिमेत तेव्हाच वेग येऊ शकतो जेव्हा मोठ्या संख्यने लस देशात उपलब्ध असेल. जर जायडस कॅडिलाची अंतिम चाचणी सकारात्मक राहिली तर लवकरच या लसीला मंजुरी मिळेल त्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

१८ जून २०२१ ला आलेल्या वृत्तानुसार, जायडस कॅडिला पुढील ८ ते १० दिवसांत कोरोना लस ZyCov D च्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करू शकते. सध्या भारतात तीन कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. यात कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक लसीचा समावेश आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. अशात जर १२ ते १८ वयोगटातील लहान मुलांना जायडस कॅडिला कोरोना लस दिल्याने मोठा दिलासा मिळेल.

 

जायडस कॅडिलाचे तीन डोस

जायडस कॅडिला ही लस जगभरातील इतर लसींपेक्षा वेगळी आहे. अनेक लसींचे दोन डोस दिले जातात. कोविशील्ड, स्पुतनिक आणि कोव्हॅक्सिन या लसींचे दोन डोस दिले जातात. परंतु जायडस लसीचे दोन नव्हे तर तीन डोस लावावे लागणार आहेत.

पुढील काही काळात दिवसाला १ कोटी लसीकरणाचं लक्ष्य

कोविड टास्क फोर्सकडून सांगितले आहे की, तिसरी लाट येण्यास उशीर होणार असल्याचा दावा ICMR च्या रिपोर्टमधून केला आहे. आपल्याकडे लसीकरण करण्यासाठी ६-८ महिने वेळ आहे. येणाऱ्या काळात प्रति दिन १ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचं लक्ष्य आहे असं त्यांनी सांगितले. त्यासोबतच डॉक्टर गुलेरिया म्हणाले की, भारत बायोटेकच्या लसीचे २ ते १८ वयोगटातील मुलांवर केलेल्या चाचणीचे परिणाम लवकरच येतील. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत येण्याची आशा आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर भारतात लहान मुलांचं लसीकरण करू शकतो.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या