शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

महत्वाचे कॉलम न्युज १

By admin | Updated: August 27, 2015 23:45 IST

चेहडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी

चेहडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी
नाशिक : चेहडी परिसरात ठिकठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य असून, डासांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मनपा सफाई कर्मचारी या परिसरात फिरकत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी
नाशिक : पंचवटी कारंजा परिसरात रिक्षाचालक आणि व्यावसायिकांच्या हुल्लडबाजीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, टवाळखोरांना चाप लावण्याच्या दृष्टीने पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
राखी मेकिंग कार्यशाळा
उत्साहात
नाशिक : वाघ गुरुजी बालशिक्षण विद्यालयात इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी हस्तकला, तसेच टाकाऊतून टिकाऊ साहित्यापासून राख्या बनवल्या.
जाधवनगरमध्ये पाण्याचा अपव्यय
नाशिक : अशोकनगर येथील जाधव संकुल परिसरात जलवाहिनीमधून पाण्याची गळती सुरू असून, दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
पंचवटी ते त्र्यंबक परिसर दिंडीमय
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे शहरासह जिल्‘ातील वातावरण भक्तिमय झाले असून, पंचवटी ते त्र्यंबक मार्गावरील दिंड्या लक्ष वेधत असून, सामान्य नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.
मखमलाबाद नाका सिग्नल बंद अवस्थेत
नाशिक : मखमलाबाद नाका येथील सिग्नल वारंवार तक्रार करूनही प्रशासनातर्फे सुरू केले नसल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे.
उंटवाडी परिसरात अवैध अमली पदार्थविक्री
नाशिक : उंटवाडी खेतवानी लॉन्स प्रवेशद्वाराजवळ असलेल्या झोपडप˜ीत घरवजा दुकानातून सर्रासपणे अमली पदार्थांची विक्री होत असून, रात्री उशिरापर्यंत येथे टवाळखोरांचा राबता असतो. पोलीसदेखील याठिकाणी रात्री खरेदी करताना दिसतात.
अंबड लिंकरोड येथील बँकांना पार्किंग नाही
नाशिक : कामटवाडे परिसरातील त्रिमूर्ती चौक-अंबड लिंकरोड येथील युनियन बँक, अभ्युदय बँक, बँक ऑफ बडोदा आणि इतर बँकांना ग्राहकांसाठी पार्किं गची सोय नसल्याने थेट रस्त्यांपर्यंत पार्किंग होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
वाहनचालकांकडून वाहतूक लेनचे उल्लंघन
नाशिक : जुने सीबीएस आणि मेळा बसस्थानक परिसरात शहराकडून कॉलेजरोडकडे जाणार्‍या मार्गावर अनेक वाहनधारकांकडून ओव्हरटेक करण्यासाठी दुभाजक प˜्यांचे नियम पाळले जात नाही, तसेच वाहनवेगावर मर्यादा घालण्याची मागणी होत आहे.
सिंहस्थ पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात खाद्यपदार्थांमध्ये भेसळीची शक्यता व्यक्त केली जात असून, नागरिकांनी सावध राहावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
द्वारका परिसरात वाहतूक कोंडी
नाशिक : द्वारका चौफुलीवर सतत होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक, तसेच वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या चौफुलीवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
जॉगिंग ट्रॅकवर रंगतो क्रिकेटचा सामना
नाशिक : गोल्फ क्लब मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर सूचना फलक असूनदेखील येथे युवकांकडून क्रिकेट खेळले जात असल्याने व्यायामासाठी येणार्‍या नागरिकांना चेंडू लागणे, तसेच खेळाडूंच्या असभ्य वर्तणुकीला सामोरे जावे लागत आहे.
जगतापनगर परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य
नाशिक : सिडको येथील मातोश्री जगतापनगर परिसरातील सरस्वती विद्यालय ते गोविंदा पेट्रोलपंपापर्यंतचा रस्ता खड्ड्यांच्या समस्यांनी ग्रासला असून, खड्ड्यांमुळे वाहन खराब होण्याच्या आणि पाठदुखीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.