शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपासाठी पुरोहित ठरणार महत्त्वाचे, तामिळनाडूमध्ये मोट बांधण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 03:01 IST

तामिळनाडूच्या राज्यपालपदी बनवारीलाल पुरोहित यांची नियुक्ती भाजपासाठी महत्त्वाची आहे. तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश आणि विस्तार करण्याचे भाजपचे स्वप्न लपून राहिलेले नाही.

हरीश गुप्तानवी दिल्ली : तामिळनाडूच्या राज्यपालपदी बनवारीलाल पुरोहित यांची नियुक्ती भाजपासाठी महत्त्वाची आहे. तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश आणि विस्तार करण्याचे भाजपचे स्वप्न लपून राहिलेले नाही. अद्रमुकसोबत राजकीय आघाडी करणे आणि राज्याच्या राजकारणात अस्तित्व निर्माण करणे, यासाठी पुरोहित यांची मदत होईल, असे भाजपाला वाटते. या आघाडीत दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन यांना घेण्याचाही भाजपाचा प्रयत्न आहे.बनवारीलाल पुरोहित यांना पदोन्नती देऊन भाजपने विदर्भाला झुकते माप दिले आहे. या भागात पक्षाच्या एकजुटीसाठी भाजप प्रयत्न करत आहे. दक्षिणेतील तामिळनाडू या सर्वात मोठ्या राज्यात सध्या राजकीय प्रचंड अस्वस्थता आहे. सत्ताधारी अद्रमुकमध्ये गोंधणाचे वातावरण आहे आणि द्रमुकमध्येही चढ-उतार सुरू आहेत. द्रमुकचे नेते करुणानिधी यांची प्रकृतीही तोळामासा आहे. अशा काळात भाजपने पुरोहित यांना आसाममधून एका वर्षाच्या आतच तामिळनाडूत पाठविले आहे. पुरोहित लोकसभेसाठी तीनदा निवडून आले होते. यातील दोन वेळा काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केले. राम मंदिराच्या मुद्यावरुन त्यांनी पक्षाला राम राम केला होता. त्यानंतर ते भाजपत सहभागी झाले व खासदारही झाले. महाराष्ट्रात ते मंत्रीही होते.१२ आॅक्टोबरपासून दिल्लीत राज्यपाल संमेलन१२ आॅक्टोबरपासून दिल्लीत होणाºया दोन दिवसीय राज्यपाल संमेलनासाठी पुरोहित दिल्लीत येतील. तेव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, तसेच अन्य भाजपा नेत्यांना भेटतील, अशी शक्यता आहे. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच अशा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे राज्यपाल ईएसएल नरसिम्हन हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचीही सक्रीय भूमिका आहे. कारण राज्यांचा विकास आणि राजकीय स्थैर्य यासाठी राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांचे मत आहे. मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांच्या नियुक्त्या नंतर केल्या जाणार आहेत.

टॅग्स :BJPभाजपा