शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

भारताचे महत्त्व अमान्य असलेले दुही माजवितात - भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 4:59 AM

जागतिक स्तरावर भारताचे वाढते महत्व ज्यांच्या डोळ््यांना खुपत आहे अशा प्रवृत्ती इतिहासाचे विकृतीकरण करुन समाजात दुफळी माजवत आहेत, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी येथे केला.

वाराणसी : जागतिक स्तरावर भारताचे वाढते महत्व ज्यांच्या डोळ््यांना खुपत आहे अशा प्रवृत्ती इतिहासाचे विकृतीकरण करुन समाजात दुफळी माजवत आहेत, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी येथे केला.भागवत म्हणाले की, १८५७च्या स्वातंत्र्यसमराच्या आधीही देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये ऐक्य व बंधुभाव होता. हे दोन्ही समाज नेहमीच एकत्र होते. मात्र १९०५ साली मुस्लीम लिगची स्थापना झाली आणि त्यानंतर देशामध्ये मोठ्या प्रमाणात मुलतत्ववादाचा प्रसार सुरू झाला. अजूनही या प्रवृत्ती समाजात मूळ धरून आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील ट्रेड फॅसिलिटेशन सेंटरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजिलेल्या कार्यक्रमात स्वयंसेवकांसमोर बोलताना मोहन भागवत यांनी देशविघातक कार्य करणाºयांच्या विरोधात जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. रा. स्व. संघ हा सामाजिक सलोखा वाढावा, यासाठीच नेहमी प्रयत्नशील राहिला आहे. ज्याच्या मनात अहंकार नाही असे स्वयंसेवकच आपल्या कार्याद्वारे देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात. या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ नेतेओम माथुर, महेंद्रनाथ पांडे, सुनील बन्सल, लक्ष्मण आचार्य आदी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)संघ स्वयंसेवकांनी एकजुटीने राहावे आणि संघभावनेने कार्याला वाहून घ्यावे. स्वयंसेवकांनी निस्वार्थी बुद्धीने कार्यरत राहावे, असे सांगून, आपण संघटनेपेक्षा मोठे आहोत अशी भावना तुमच्या मनात निर्माण होता कामा नये. संघाच्या स्वयंसेवकांनी सत्याचा मार्ग अनुसरावा व आपल्या मुल्यांशी कधीही प्र्रतारणा करु नये, असे स्वयंसेवकांना ऐकवले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत