शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तूर, मूग, उडदाची आयात खुली होताच दर आले खाली; धान्य बाजारपेठांमध्ये खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 07:13 IST

केंद्र सरकारचा निर्णय : तूरडाळीचे दर ३०० रुपयांनी उतरले

नागपूर : केंद्र सरकारने १५ मे रोजी अधिसूचना काढून तूर, मूग आणि उडीद यांच्या आयातीवर असलेले प्रतिबंध शिथिल केले. त्यामुळे तीन दिवसांतच तूरडाळीचे दर प्रति क्विंटल ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. याशिवाय तूर, मूग आणि उडदाच्या दरात प्रत्येकी प्रतिक्विंटल २०० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र सुखावला आहे.

देश डाळींमध्ये आत्मनिर्भर बनावा आणि शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवर प्रतिबंध लावले होते. या वस्तूंच्या आयातीसाठी सरकार व्यापाऱ्यांना परवाना द्यायचा आणि वर्षभराचे आयातीचे प्रमाण ठरवून दिले जायचे; पण आता आयातीवरील प्रतिबंध हटविल्याने व्यापाऱ्यांना या वस्तूंची आयात कितीही प्रमाणात करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना या वस्तूंची आधारभूत किंमत मिळणार नाही. त्याचा शेतकऱ्यांना तोटा होणार आहे. केंद्राच्या या निर्णयाने बाजारपेठांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होणार आहे. या निर्णयाचा परिणाम बाजारपेठांवर झाला आहे. अचानक भाव कमी होऊ लागले आहेत.

बुधवारी सायंकाळी तुरीत २०० आणि तूरडाळीच्या किमतीत ३०० रुपयांची घसरण झाली. मुंबई आयातीत लेमन तूर प्रतिक्विंटल ६,५०० ते ६,३००, नागपुरात गावरान तुरीचे दर ७,१५० रुपयांवरून कमी होऊन ६,९५० आणि डाळीचे भाव ८,७०० ते १० हजार १०० रुपये होते. याशिवाय आयातीत उडद मुंबई पोर्टवर २०० रुपयांनी कमी होऊन ६,८००, उडद मोगर ८,४०० ते १० हजार ७०० रुपये आणि चण्यात २०० रुपयांची घसरण झाली. चणाडाळीचे भाव ६,१०० ते ६,७०० रुपयांवर स्थिरावले.  डाळीचे भाव ६,६०० ते ६,८०० रुपयांपर्यंत कमी झाले. तर मूग मोगर ८,५०० ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत कमी झाले. केंद्राच्या निर्णयाचा परिणाम पुढेही घसरणीवर होणार आहे. लॉकडाऊन काळात सरकारचा निर्णय चुकीचा असून, त्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फटका होणार असल्याचे मोटवानी यांनी स्पष्ट केले.

व्यापाऱ्यांना द्यावी लागेल साठ्याची माहितीवित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी १७ मे रोजी बैठक बोलावून देशात डाळींच्या उपलब्धतेची चर्चा केली. व्यापाऱ्यांना स्टॉकची माहिती द्यावी लागेल, असे त्यांनी बैठकीत सांगितले. सरकारतर्फे अधिसूचना जारी होताच तीन दिवसांतच बाजारात खरेदी कमी आणि विक्री जास्त झाल्याचे होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार