शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'पेट्रोल-डिझेल दरवाढ तत्काळ मागे घ्या', इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची देशव्यापी निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 06:14 IST

Congress : कोरोनासाठीचे निर्बंध मागे घेतले गेल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते, नेते शुक्रवारी देशभर रस्त्यांवर दिसले. एनएसयूआय, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसशिवाय पक्षाचे मोठे नेते या आंदोलनात सहभागी होते.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : पेट्रोल -डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात देशव्यापी निदर्शने करून काँग्रेसने मोदी सरकारकडे वाढत्या किमती ताबडतोब मागे घेण्याची मागणी केली. पक्षाची हीदेखील मागणी केली की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट ग्राहकांपर्यंत दिली जावी. अनियंत्रित वाढलेली एक्ससाइज़ ड्युटी रद्द करून पेट्रोल, डिझेलला वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) आणावे.

कोरोनासाठीचे निर्बंध मागे घेतले गेल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते, नेते शुक्रवारी देशभर रस्त्यांवर दिसले. एनएसयूआय, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसशिवाय पक्षाचे मोठे नेते या आंदोलनात सहभागी होते. मोदी सरकारविरोधात लोकमत जागृत करण्याच्या हेतूने पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्व सहयोगी पक्षांना मोदी सरकारविरोधात मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले होते. 

रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ‘भाजप भारतीय जानलूट पार्टी बनली आहे. सरकारी नफेखोरी, भाजपाई जिझिया टॅक्स, मोदीजी तुम्ही, आकाशातून लवकर परत या, आम्हाला जमिनीवरील प्रश्नांवर बोलायचे आहे.’ केंद्र सरकारने जर अबकारी शुल्क नऊ रुपयांपर्यंत कमी केले तर इंधनाच्या दरात २५ रुपये प्रति लिटर कपात होऊ शकते, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले. 

राहुल गांधी म्हणाले...राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘जीडीपी मरून जात आहे, बेरोज़गारी वाढत आहे, तेलाचे भाव आकाशाला स्पर्श करीत आहेत, भाजपचे लुटो भारतच्या पद्धती वेगळ्या आहेत.’ 

प्रियांका गांधी म्हणाल्या...काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्वीट करून म्हटले की, ‘महामारीत मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलमधून वसूल केले. २.४ लाख कोटी रुपये. या पैशांतून काय मिळू शकले असते? तर पूर्ण भारताला ६७,००० कोटी लस, ७१८ जिल्ह्यांना ऑक्सिजन प्लांट, २९ राज्यांना एम्स रुग्णालये, २५ कोटी गरिबांना सहा हजार रुपयांची मदत, पण हे मिळाले नाही.”

टॅग्स :congressकाँग्रेसPetrolपेट्रोलDieselडिझेल