शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनचं आगमन लांबणीवर, हवामान विभागाच्या अंदाजानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 13:47 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून आठवडाभर उशिरानं दाखल होणार

नवी दिल्ली: मान्सून 6 जूनला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाआधी स्कायमेटनं काल मान्सूनच्या आगमनाचं भाकीत वर्तवलं. मान्सून 4 जूनला केरळमध्ये दाखल होईल, अशी शक्यता स्कायमेटनं व्यक्त केली. मान्सूनच्या आगमनाला यंदा उशीर होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मान्सून 6 जूनला केरळमध्ये दाखल होईल. गेल्या वर्षी 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. तर 2017 मध्ये 30 मे रोजी मान्सूननं केरळमध्ये वर्दी दिली होती. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये जवळपास आठवडाभर विलंबानं दाखल होणार आहे. हवामान विभागाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यंदाचा मान्सून सर्वसाधारण असेल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला. 'अल निनोचा प्रभाव कमी असेल आणि पावसाचा हंगाम सुरू होताच हा प्रभाव आणखी ओसरेल. यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल,' अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. मान्सूनच्या आगमनाबद्दलचे गेल्या 14 वर्षांतील 13 अंदाज खरे ठरल्याचं हवामान खात्यानं म्हटलं. केवळ 2015 मध्ये अंदाज चुकला होता, असं हवामान खात्यानं सांगितलं. 2015 मध्ये हवामान खात्यानं 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र मान्सून जवळपास आठवडाभर उशीरा (5 जून) केरळमध्ये दाखल झाला.  

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान